Sakal-Newspaper
Sakal-Newspaper 
महाराष्ट्र

वृत्तपत्रे पुन्हा घराघरांत

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘कोरोना’ प्रादुर्भावामुळे काही दिवस बंद असणारी वृत्तपत्रे बुधवारपासून पूर्ववत सुरू झाली. दरम्यान, जिल्हाधिकारी प्रशासनाच्या आदेशानुसार, अत्यावश्‍यक सेवेत येणाऱ्या वृत्तपत्र वितरणाच्या प्रक्रियेतील विक्रेते, घरोघरी वृत्तपत्र टाकणाऱ्या व्यक्ती यांना वाहतुकीसाठी पेट्रोल, डिझेल देण्यास पेट्रोल विक्रेता संघटनेने होकार दर्शविला आहे.

‘कोरोना’चा संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य व्यक्तींना पेट्रोल, डिझेल विक्री करण्यास मनाई केली होती. अत्यावश्‍यक सेवेमध्ये कार्यरत असणारे सर्व अधिकारी व कर्मचारी, या घटकांमध्ये प्रसारमाध्यमांची (सर्व प्रकारचे दैनिके, नियतकालिके, टीव्ही, वृत्तवाहिन्या आदी.) कार्यालये यांच्यासह अत्यावश्‍यक वस्तू व सेवा करणाऱ्या खासगी व्यक्ती, वैद्यकीय उपचार यांना सवलत देण्यात आली होती.

दरम्यान, ‘कोरोना’मुळे मागील काही दिवसांपासून वृत्तपत्रांचे थांबलेले कामकाज मंगळवारपासून सुरू झाले. तर, बुधवारपासून प्रत्येकाच्या घरी वृत्तपत्रे येण्यास पूर्ववत सुरुवात झाली. मात्र, वृत्तपत्र विक्रेते व वितरण करणाऱ्या व्यक्तींना शहरातील काही पेट्रोलपंपांवर पेट्रोल देण्यास नकार देण्यात आला. या पार्श्वभूमीवर शहरातील पेट्रोल विक्रेता संघटनेस जिल्हाधिकारी प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार, वृत्तपत्रे अत्यावश्‍यक सेवेत येत असल्याची माहिती देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.

त्यानंतर संघटनेने शहरातील सर्व पेट्रोलपंप चालक, मालक यांना याबाबतच्या तत्काळ सूचना दिल्या.  त्यानुसार, वृत्तपत्रे, त्यांचे पत्रकार, अधिकारी, कर्मचारी यांच्यासमवेत वृत्तपत्र विक्रेते, वृत्तपत्राचे वितरण करणाऱ्या व्यक्ती यांना पेट्रोल आणि डिझेल देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

जिल्हाधिकारी व पोलिस प्रशासनाचे सर्व नियम पाळून वृत्तपत्रांचे विक्रेते व वितरण करणाऱ्या व्यक्ती यांना पेट्रोल देण्यात यावे, याबाबतच्या सूचना आम्ही सर्व पेट्रोलपंप चालकांना दिल्या आहेत. त्यानुसार, संबंधित व्यक्तींना पेट्रोल, डिझेल देण्यात अडचण येणार नाही.
- अली दारूवाला, राष्ट्रीय प्रवक्ते, ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन

जिल्हाधिकारी प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार, पुणे शहर व जिल्ह्यातील पत्रकार व वृत्तपत्र वाटप करणाऱ्यांना पेट्रोल देण्यात येणार आहे. त्यांनी त्यांच्याकडे अधिकृत ग्राह्य धरले जाणारे ओळखपत्र जवळ ठेवावे. 
- सुनील रुकारी, उपाध्यक्ष, पेट्रोल डीलर्स असोसिएशन, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT