zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

पुढचे शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून! अकरावीच्या विद्यार्थ्यांना यंदा उन्हाळा सुट्टीतही कॉलेज; ११ ऑगस्टपासून सुरू होणार वर्ग; २२० दिवस अध्यापन शिक्षकांसाठी बंधनकारक

इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने राबविली जात आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जुलैअखेर वाट पाहावी लागणार असून ११ ऑगस्टपासून अकरावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होणार आहेत. महाविद्यालये उघडण्यास एक महिना विलंब होणार असल्याने अकरावीच्या विद्यार्थ्यांना मेअखेर महाविद्यालयात यावे लागणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने राबविली जात आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जुलैअखेर वाट पाहावी लागणार असून ११ ऑगस्टपासून अकरावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होणार आहेत. महाविद्यालये उघडण्यास एक महिना विलंब होणार असल्याने अकरावीच्या विद्यार्थ्यांना मेअखेर महाविद्यालयात यावे लागणार आहे.

राज्यातील २१ लाख विद्यार्थ्यांपैकी पाच लाख १३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. आता मागील तीन दिवसांत पावणेतीन लाख विद्यार्थ्यांनी अर्धवट माहिती भरून व पसंतीक्रम बदलून त्यांचे अर्ज लॉक केले आहेत. १७ जुलैला या विद्यार्थ्यांची दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर चार दिवसांत सर्वांना प्रवेश घ्यावे लागणार आहेत. २३ जुलैला रिक्तपदांची माहिती जाहीर करून पाचव्या दिवशी (२८ जुलै) तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी चार दिवसांचा कालावधी दिला जाणार असून पुढे आवश्यकता भासल्यास चौथी गुणवत्ता यादी देखील जाहीर होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे अकरावीच्या विद्यार्थ्यांचे सरसकट वर्ग ११ ऑगस्टपासून सुरू होतील, असेही ते म्हणाले.

अकरावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी

अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांनी प्रवेशही घेतले आहेत. या पार्श्वभूमीवर ज्या कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रवेश ५० टक्के झाले आहेत, त्या महाविद्यालयांना अकरावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यास माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे. पण, बहुतेक महाविद्यालये अद्याप सुरू झालेली नाहीत.

पुढचे शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून

अध्यापनाच्या तासिका वाढवून व सुट्यांचे दिवस कमी करून आगामी शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून त्यावर अभ्यास सुरू झाला आहे. दिवाळीमध्ये त्यासंदर्भातील वेळापत्रक जाहीर होईल, असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

वर्षात २२० दिवस होईल अध्यापन

अकरावीची प्रवेश प्रक्रिया लवकरच संपवून ११ ऑगस्टपासून महाविद्यालये सुरू करायची आहेत. महाविद्यालये यंदा उशिरा सुरू होत असल्याने शैक्षणिक वर्षात किमान २२० दिवस अध्यापन होणे आवश्यक आहे. त्यानुसार अकरावीचे वर्ग पुढे सुरू राहतील.

- श्रीराम पानझडे, उपसंचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण

अकरावी प्रवेशाची सद्य:स्थिती

  • एकूण विद्यार्थी

  • २१ लाख

  • आतापर्यंत प्रवेश घेतलेले

  • ५.१८ लाख

  • दुसरी गुणवत्ता यादी

  • १७ जुलै

  • महाविद्यालयांची सुरवात

  • ११ ऑगस्टपासून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: शिक्षण क्षेत्रात अनेक समस्या! शिक्षकांच्या ॲप्रूव्हल अन् अपॉइंटमेंटसाठीही पैसे लागतात, नितीन गडकरींचा परखड टोला!

Russian Woman : हिंदू संस्कृतीने भारावून गेलेली रशियन महिला मुलांसह आढळली गोकर्णच्या जंगलात; गुहेत तिच्यासोबत काय घडलं?

Panchang 13 July 2025: आजच्या दिवशी ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

Latest Marathi News Updates : शरद पवारांच्या पक्षात भाकरी फिरणार? प्रदेशाध्यक्षपदासाठी शशिकांत शिंदेंचे नाव चर्चेत

Sunday Healthy Breakfast: रविवारी सकाळी नाश्त्यात बनवा पौष्टिक व्हेजिटेबल मुग डोसा, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT