nilesh rane, sanjay raut Esakal
महाराष्ट्र बातम्या

Nilesh Rane l महाराष्ट्राची वाट लावणाऱ्यांना धडा शिकवायलाच हवा

राऊत कोणाच्या नीतिमत्ते बद्दल बोलतात? निलेश राणे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची ईडीकडून चौकशी (ED Enquiry) सुरू आहे. महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्र्याला घरी येऊन घेऊन जातात हे योग्य नाही. फक्त २०२४ पर्यंत हे चालेल. २०२४ नंतर ते आहेत आणि आम्ही आहोत, असा इशारा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज इशारा दिला. यावर भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करत संजय राऊत (Sanjay Raut) आणि नवाब मलिक यांच्यावर घणाघात केला आहे.

निलेश राणे भाजपवर निशाणा साधताना म्हणतात, देशद्रोह्यांशी संगनमत करून महाराष्ट्राची वाट लावणाऱ्यांना धडा शिकवायलाच हवा. मुंबईत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दाऊद इब्राहिमच्या हस्तकाकडून जमीन खरेदी करणं आणि थेट संबंध असणाऱ्या नवाब मलिक याचा कार्यक्रमच नव्हे तर पुरता बंदोबस्त व्हायला हवा असे टीकास्त्र राणेंनी सोडले.

देशद्रोह्यांशी संगनमत करून महाराष्ट्राची वाट लावणाऱ्यांना धडा शिकवायलाच हवा.

संजय राऊत यांना टोला लागवताना राणे म्हणाले, महाविकास आघाडीच्या लोकांवर कारवाई झाली तर तपास यंत्रणेचा दुरूपयोग पण ठाकरे सरकारने संपूर्ण यंत्रणा विरोधकांना उद्ध्वस्त करण्यासाठी लावली तर ते योग्य. स्वतःवर आलं तेव्हा झोंबलं. राऊत कोणाच्या नीतिमत्ते बद्दल बोलतात? असा राणेंनी प्रश्न उपस्थित केला.

काय म्हणाले संजय राऊत

२३ हजार कोटींचा शिपयार्ड कंपनींचा घोटाळा आहे. इतके वर्ष त्याला कोण संरक्षण देत आहे. ऋषी अग्रवाल यांच्यामागे कोण उभं आहे? त्यांच्यामागे कुठल्या तपासयंत्रणा आहे आणि या सरकारमधील कोणता परिवार त्यांच्यामागे उभा आहे? हे सर्व मी सांगणार आहे. केंद्रीय तपास यंत्रणांची पोलखोल करणार आहे. त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल, असं संजय राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT