महाराष्ट्र बातम्या

माझ्या दंडावर बळजबरीने इंजेक्शन टोचलं, नितीन देशमुखांचा खळबळजनक खुलासा

धनश्री ओतारी

राज्यभर राजकीय नाट्याने जोर धरला असून काल शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली होती. याअगोदर त्यांच्या पत्नीने ते हरवले असल्याची तक्रार केली होती.

दरम्यान, ते नागपुरात दाखल झाले असून त्यांनी मला हृदय विकाराचा झटका आला नव्हता. माझ्या दंडावर बळजबरीने इंजेक्शन टोचले. अशा धक्कादायक खुलासा नितीन देशमुख यांनी केला आहे.

मी शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंचाच शिवसैनिक आहे. मी आलो बाकीचेही येतील असा दावा त्यांनी यावेळी केला. मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकच राहणार असे स्पष्ट नितीन देशमुख यांनी यावेळी केले.

एकिकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मविआ सरकार बरखास्त होणार असल्याचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. शिवसेनेने भाजपासोबत सरकार बनवावं, मंत्रिपद दिलं नाही तरी चालेल अशी भूमिका शिंदेंनी घेतली आहे.आज दुपारी शिंदे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार असून आपला गट हीच खरी शिवसेना असा दावा त्यांनी केला आहे.

दरम्यान, त्यांच्यासोबत असणारे आमदार नितीन देशमुख पुन्हा महाराष्ट्रात परतले आहेत. राज्यात परतताच त्यांनी त्यांच्या प्रकृतीसंदर्भात गंभीर दखल घेत मोठा खुलासा केला. मला हार्टअॅटक आला नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMT Bus: दोन किलोमीटरसाठी १० रुपये तर..., ठाणेकरांवर महागाईचं संकट; टीएमटी बसच्या तिकीट दरात वाढ

Income Tax: खात्यात 1.33 कोटींचे व्यवहार, ITRही भरला नाही; तरी निवृत्त शिक्षक केस कसे जिंकले? 26 दिवसांनी पलटला गेम!

KDCC Bank Election : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले! आजपासून ठराव प्रक्रिया सुरू, 15 ते 31 डिसेंबरदरम्यान होणार मतदान?

Marathi News Live Updates: मुळशी धरणग्रस्तांच्या मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग उपोषण

Honey Trap Case : बोगस फेसबुक आयडीद्वारे भाजप नेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल केलं; नऊ व्हिडिओ, धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT