Nitesh Rane asked Aditya Thackeray if it is ok to speak about BMC corruption on loudspeaker  Esakal
महाराष्ट्र बातम्या

"महागाईवर भोंगे लावण्या अगोदर.."; राणेंचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

सकाळ डिजिटल टीम

राज्याच्या मागील काही दिवसांपासून मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा या दोन मुद्द्यांवर राजकीय वातावरण वातावरण चांगलेच तापले आहे. यादरम्यान पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी भोंग्यावर प्रतिक्रिया देताना भोंगे लावले तर त्यावर महागाईबद्दल बोला असे म्हटले होते, यावर भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विट करत "महागाई वर भोंगे लावण्या अगोदर.." असं म्हणत आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय.

मुंबई महानगरपालीका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राणे यांनी आदित्य ठाकरेणा बीएमसीतील भ्रष्टाचारार सांगणारे भोंगे चालू केले तर चालतील का असा सवाल केला आहे. नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, "महागाई वर भोंगे लावण्या अगोदर.. BMC भ्रष्टाचार सांगणारे भोंगे मुंबई मध्ये चालू केले तर चालतील का?" या पुढे त्यांनी "पेंग्विन भ्रष्टाचार पासून सुरू करू…" असा टोलाही ठाकरे यांना लगावला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका जाहिर करत राज्य सरकारला ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवा असा अल्टिमेटम दिला होता, अन्यथा मशिदींसमोर भोंगे लावून त्यावर हनुमान चालीसा म्हणू असे त्यांनी सांगीतले होते. दरम्यान मनसेने भोंगे लावल्यास त्यावरुन वाढत्या महागाईविषयी जनतेला माहिती द्यावी. पेट्रोल-डिझेल, सीएनजी आणि इतर गोष्टींची दरवाढ कशामुळे झाली, हे मनसेने (MNS) सांगावे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी मनसेला केले होते.

यातच मशिदींवरील भोंग्यांवरून राज यांच्या भूमिकेमुळे मनसे पक्षातील काही मुस्लिम पदाधिकारी कार्यकर्ते नाराज आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

Marathi Bhasha Vijay Melava : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात...

Asaduddin Owaisi: ओवेसींच्या एमआयएमने बिहार महाआघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त

SCROLL FOR NEXT