nitin raut on congress bharat jodo yatra eye injury incident in hyderabad  
महाराष्ट्र बातम्या

Bharat Jodo Yatra: "पोलिस अचानक लोकांवर तुटून पडले, अन्.."; नितीन राऊतांनी सांगितलं दुखापतीचं कारण

सकाळ डिजिटल टीम

कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा येत्या काही दिवसाता महाराष्ट्रात दाखल होणार आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान धक्काबुक्की झाल्याने काँग्रेस आमदार आणि राज्याचे माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलं होतं. दरम्या राऊत यांनी त्यांना झालेल्या अपघातानंतर नितीन राऊत यांनी त्यांना झालेल्या दुखापतीबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेत हैदराबाद (Hyderabad) इथं सहभागी झाले असताना माजी मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांना कुणाचा तरी धक्का लागला आणि तोल जाऊन ते खाली कोसळले होते. यामुळं त्यांचा डावा डोळ्याला जखम झाली असून, त्यांना उपचारासाठी हैदराबाद येथील इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं.

हेही वाचा : राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

नितीन राऊत म्हणाले की, भारत जोडो यात्रा जेव्हा सुरू झाली, तेव्हापासून मी त्या यात्रेत सहभागी झालेलो नव्हतो. कारण मध्यंतरी मी आजारी असताना जाऊ शकलो नाही. नंतर थोडं बरं वाटल्यावर मला वाटलं तिथे जावं. त्यामुळे हैदराबादला यात्रेत सहभागी व्हायला गेलो. विमानतळावर उतरल्यानंतर मी सरळ इंदिरा गांधींच्या पुतळ्याच्या ठिकाणी कार्यक्रमा होता, चारमिनावरून पदयात्रा जाऊन तिथे कार्यक्रम लागणार होता तेथे गेलो”

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, "जवळपास ट्राफीक बंद असल्याने पाच किलोमीटर चालत मी इंदिरा गांधींच्या पुतळ्याजवळ पोहोचलो. स्टेजच्या जवळ पोहोचलो तेव्हा राहुल गांधींचा ताफा तिथे दाखल झाला. तिथे गर्दी खूपच प्रचंड होती. पोलिस अस्वश्थ झाले. पोलिसांना काय झालं माहिती नाही, ते अचानक लोकांवर तुटून पडले. त्यांना बाजूला करायला लागले, मी कोपऱ्यात होतो तरी मला छातीवर हात ठेवून स्वत: एसीपी आणि चार पोलिसांनी जोरात धक्का दिला. समोरून ढकलल्यामुळे मला डोक्यावर लागणार असं वाटत असतानाच मी स्वत:ला सावरलं. या भागात रस्त्यावर पडलो आणि जोरात मार लागला. सारखं ब्लिडींग होतं होतं. त्यानंतर सारखं २२ मिनिटं ब्लिडींग होतं होतं. पण कुणीही आलं नाही, पोलीसही आले नाहीत. कार्यकर्त्यांनी घेराव घातला."

“अल्पसंख्य विभाग आणि अनुसूचित जाती विभागाच्या कार्यकर्त्यांनी मला सावरलं. थंड पाण्याची बाटली एकानं दिली. ते पाणी डोक्यावर टाकलं. तरी ब्लिडींद थांबत नव्हतं. ताफ्यातच एक अॅम्ब्युलन्स होती. त्यात मला प्राथमिक उपचार देण्यात आले. ते घेतल्यानंतर म्हणाले, रक्तस्राव थांबत नाही. तुम्ही तातडीने रुग्णालयात जा. त्यानंतर दीड ते दोन किलोमीटर पायी गेल्यानंतर आम्ही चहाच्या एका टपरीवर कुणाकडे गाडी आहे का? विचारलं तेव्हा तो बाईक घेऊन आला. त्या बाईकवर ते मला रुग्णालयात घेऊन गेले. तिथे उपचार झाले” असे राऊत यांनी सांगितलं.

“उजव्या डोळ्यावर मला जबर मार लागला आहे. आतमध्ये हेअरलाईन क्रॅक झालं आहे. पण डोळा वाचला. मी रुग्णालयात जाईपर्यंत राहुल गांधी, वेणुगोपाल राव, मल्लिकार्जुन खर्गे यांचा मला फोन आला. काँग्रेसचे पदाधिकारी मला भेटायला आले", असेही नितीन राऊत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT