Weather Update ESakal
महाराष्ट्र बातम्या

उत्तर-पश्चिम, मध्य भारतात पुढील 5 दिवस कोरड्या हवामानाची शक्यता

ऐन हिवाळ्याच्या दिवसात थंडी गायब झाल्याने रब्बी हंगामावर परीणाम होऊ शकतो.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत आहेत. पहाटे थंडी तर रात्री तापमानात वाढ होत आहे. नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रासह (Maharashtra) दक्षिण-पूर्व भारतात अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली होती. डिसेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे, मात्र अजूनही अपेक्षित अशी थंडी पडलेली नाही. ऐन हिवाळ्याच्या दिवसात थंडी गायब झाल्याने रब्बी हंगामावर परीणाम होऊ शकतो. गहू, हरभरा व ज्वारी यांसारख्या पिकांना हवामानातील गारवा पोषक ठरतो. अद्याप पुरेशी थंडी नाही. थंडी कमी झाल्यास या पिकांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. (North West Central India Weather Update)

दरम्यान, पुढील 5 दिवसात उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात कोणताही विशेष बदल झालेला नाही. त्यामुळे पुढील 5 दिवसात उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागात थंडीची लाट नाही. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

गेली काही दिवस कोकणात पावसाळी आणि ढगाळ वातावरणामुळे आंबा पिक धोक्यात आले होते. थंडीचाही लवलेश नव्हता. मात्र हवामान विभागाने आंबा बागायतदारांना दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. पुढील 5 दिवस हवामान कोरडे राहणार आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांना दिलासा मिळू शकतो. अनेक ठिकाणी पावसामुळे मोहर वाया गेला असून, शिल्लक राहिलेल्या मोहराला कणी (बारीक कणी ) फुटण्यासाठीचे वातावरण निर्माण होणार आहे. हा एक प्रकारे प्रतिकूल परिस्थितीत बागायतदारांसाठी आशादायी आहे. तसेच पालवी फुटणारी जी कलमे आहेत. त्याला मोहर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market AI Rules: शेअर बाजारात AI च्या मदतीने ट्रेडिंग करताय? थांबा! गुंतवणुकीबाबत SEBIचा मोठा इशारा; जाणून घ्या नवे नियम

Koyna Dam Water level Update : महाबळेश्वर, नवजा अन् कोयनेत दमदार हजेरी; गेल्या 12 तासांत 'इतक्या' मिमी पावसाची नोंद, धरणाची स्थिती काय?

Latest Marathi News Live Update : उत्तराखंडमध्ये पावसाचा तडाखा; बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळून महाराष्ट्रातील भाविक अडकले

'वॉर्नरलाही जेजुरीचा भंडारा लावला होता' देवदत्त नागेने सांगितला परदेशातील भन्नाट किस्सा

Kolhapur ACB Trap : शाहूवाडीत PWD च्या शाखा अभियंत्याला 38 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'या' कामाच्या बिलासाठी मागितली होती रक्कम

SCROLL FOR NEXT