anil parab
anil parab anil parab
महाराष्ट्र

आता अनिल परब निशाण्यावर! ईडीने धाडली नोटीस

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होऊ शकते. याबाबतची माहिती ट्विट करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत यांनी यावरुन भाजपवर टीकास्त्र डागलं आहे. त्यांनी म्हटलंय, शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. Chronology कृपया समज लिजीये. पुढे त्यांनी म्हटलंय की, कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू. अनिल परब यांना आता येत्या मंगळवारी हजर राहण्याचे आदेश या नोटीशीमध्ये देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी गेल्या मंगळवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. काही वेळातच त्यांची जामिनावर सुटकाही झाली. पण नारायण राणे यांच्या अटकेमध्ये राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमुळे राणे यांच्या अटकेमागे अनिल परब असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, भाजपाने चहूबाजुंनी अनिल परब यांची कोंडी करण्याचे प्रयत्न चालवले आहेत, असं बोललं जातंय. याआधी आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांच्या अटकेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या अटकेमागे अनिल परब असल्याचा भाजपचा आरोप आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने राजकीय कुरघोडी करण्यासाठी ही नोटीस पाठवली असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT