higher education exam sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! आता प्राध्यापकांची वर्गातच बायोमेट्रिक हजेरी; नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठात अंमलबजावणी; प्रत्येक वर्गात असणार सीसीटीव्ही कॅमेरे

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आता पदवी व पदव्युत्तर पदवीसाठी सुरू झाली असून त्यात विद्यार्थ्यांची गुणवत्ता व त्यांच्या आवडी-निवडीस प्राधान्य देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्राध्यापकांची हजेरी क्लासरूममध्ये बायोमेट्रिकद्वारे नोंदविली जाणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आता पदवी व पदव्युत्तर पदवीसाठी सुरू झाली असून त्यात विद्यार्थ्यांची गुणवत्ता व त्यांच्या आवडी-निवडीस प्राधान्य देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या तासिका नियमित व्हाव्यात, यासाठी प्रत्येक उच्च महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. तर प्राध्यापकांची हजेरी क्लासरूममध्ये बायोमेट्रिकद्वारे नोंदविली जाणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित १०८ उच्च महाविद्यालये असून विद्यापीठात ३७ विभागांची ११ संकुले आहेत. त्याअंतर्गत ७० हजारांवर विद्यार्थी प्रवेशित आहेत. विद्यापीठाच्या संकुलातील विद्यार्थ्यांची संख्या चार हजारांवर आहेत. विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे नियमित तास होतात, पण त्यासाठी विद्यार्थी उपस्थित राहणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक वर्गांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. जेणेकरून दररोज सर्व विषयांचे तास होतात का?, त्यासाठी किती विद्यार्थी उपस्थित राहतात? हे विद्यापीठासह त्या-त्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांना समजणार आहे.

दुसरीकडे प्राध्यापकांची हजेरी त्यांच्या क्लासरूममध्ये नोंदविली जाणार आहे. त्याची सुरवात विद्यापीठातील संकुलापासून केली जाणार असून, तत्पूर्वी कुलगुरू त्यासंदर्भातील अभ्यास करून अहवाल देण्यासाठी स्वतंत्र कमिटी स्थापन करतील. समितीच्या अहवालानंतर त्यानुसार अंमलबजावणी केली जाणार आहे. प्राध्यापकांना नवीन बदलानुसार पहिल्या तासाला व शेवटच्या तासाला हजेरी नोंदविण्यात येणार आहे. ही पद्धत २०२६-२७ पासून सर्व संलग्नित महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात येणार आहे.

१२ जूनपासून शैक्षणिक वर्षाची सुरवात

विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्राची सुरवात १२ जूनपासून होणार असून तत्पूर्वी, बहुतेक विद्यार्थ्यांचे सत्र परीक्षांचे निकाल जाहीर होतील. एक लाख ८२ हजार उत्तरपत्रिकांपैकी ९० हजारांहून अधिक उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित उत्तरपत्रिका पुढील आठवड्यापर्यंत तपासून पूर्ण होतील. त्यानंतर फोटोकॉपीसाठी काही दिवसांची मुदत राहील आणि अंतिम निकाल जाहीर केले जाणार आहेत.

यंदा विद्यापीठ संकुलात, पुढच्या वर्षी महाविद्यालयांमध्ये

शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना मिळणारे जॉब आणि परीक्षा पद्धतीवर विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांचे मानांकन निश्चित होते. या पार्श्वभूमीवर आता प्राध्यापकांची हजेरी त्यांच्या वर्गातच बायोमेट्रिक पद्धतीने नोंदविली जाईल. त्याची सुरवात विद्यापीठातील संकुलापासून होईल, त्याची निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढच्या शैक्षणिक वर्षापासून (२०२६-२७) सर्व संलग्नित महाविद्यालयांमध्ये ते सुरू होईल.

- डॉ. प्रकाश महानवर, कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Farmers: नुकसान भरपाई मेल्यावर देणार का? शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला संतप्त सवाल

PCMC News : डिजिटल पेमेंट सुविधेअभावी नागरिक त्रस्त, महापालिका रुग्णालयांत रोख रक्कम बाळगणे भाग; उपचारांत विलंब

Ravet Pollution : रावेत, आकुर्डीत धूलिकणांच्या प्रमाणात वाढ; प्राधिकरण, निगडी, किवळे भागांतही त्रास, आरोग्यावर दुष्परिणाम

Yeldari Dam: येलदरी धरण धोक्याच्या पातळीवर; १८०० क्युसेक पाणी विसर्गामुळे पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pune Crime: प्रांजल खेवलकरविरोधात आणखी एक गुन्हा; महिलेने केले गंभीर स्वरुपाचे आरोप

SCROLL FOR NEXT