meter readings
meter readings Sakal
महाराष्ट्र

तुम्ही वीज वापरतायं ना? आता जितका रिचार्ज, तेवढीच मिळेल वीज! शॉकपासून बचाव व‌ आकडा टाकून वीजचोरी रोखण्यासाठी खांबावर दिसणार ‘एबी’ केबल

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : वीजचोरी व गळती रोखून आता थकबाकीच्या कटकटीतून ‘महावितरण’ आता मोकळा श्वास घेणार आहे. शेतकरी (कृषीपंप) सोडून घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक अशा सर्वच ग्राहकांना आता प्रिपेड मीटर दिले जाणार आहेत. जिल्ह्यातील १२ लाख तर सोलापूर शहरातील दोन लाख ३१ हजार ग्राहकांचा त्यात समावेश आहे. ग्राहक जेवढा रिचार्ज करतील तेवढीच वीज त्यांना वापरता येणार आहे.

सध्या वीजपुरवठा करण्यासाठी ‘महावितरण’ने खांबांवरून खुल्या तारा टाकल्या आहेत. पावसाळ्यात, वादळात अनेकदा तारा एकमेकांना किंवा झाडाला चिकटतात आणि त्यामुळे तांत्रिक अडथळा येतो व वीजपुरवठा खंडीत होतो. आता ‘एबी’ (एरियल बंडल‌ केबल) केबल टाकल्यानंतर ना झाडांचा ना पावसामुळे अडचण येते. तारांना अडथळा करणाऱ्या झाडांची छाटणी देखील करण्याची गरज भासणार नाही अशी ही केबल आहे.

पहिल्या टप्प्यात सोलापूर शहरातील मजरेवाडी, सेटलमेंट फ्रि कॉलनी अशा विविध परिसरात ९० किलोमीटर एबी केबल टाकली जाणार आहे. त्यासंबंधीचा ‘महावितरण’ने यापूर्वी सर्व्हे केला असून त्याची निविदा देखील प्रसिद्ध होऊन मक्तेदार निश्चित झाला आहे. आगामी काही दिवसांत या कामाला सुरवात होईल. त्यानंतर पुढच्या टप्प्यात शहरातील १५० किलोमीटरचे काम देखील होणार आहे.

सोलापूर शहर- ग्रामीणमध्ये एकूण ५०० किलोमीटर अशी केबल टाकली जाणार आहे. भविष्यात उच्चदाब वाहिनींवर आता कोटिंग कंडक्टर बसविले जाणार असल्याने शॉक लागून मृत्यू किंवा गंभीर जखमी होण्याच्या घटना थांबणार आहेत. तर ‘एबी’ केबलमुळे तारांवर आकडे टाकून कोणालाही चोरून वीज घेता येणार नाही.

  • सोलापूर शहरातील स्थिती

  • शहरातील ग्राहक

  • २.३१ लाख

  • ‘महावितरण’ची लाईन

  • २१८ किमी

  • ‘महावितरण’ कार्यालये

  • २९

  • दररोज वीजेची मागणी

  • १२० मेगावॅट

शहरातील सर्वच ग्राहकांना आता प्रिपेड मीटर

सोलापूर शहरासह जिल्ह्यातील सर्वच ग्राहकांच्या घरी आता प्रिपेड मीटर बसविले जाणार आहेत. त्याची निविदा निघाली असून मक्तेदारही निश्चित झाला आहे. काही महिन्यात त्याचे काम सुरु होईल. दुसरीकडे वीजेचा शॉक लागून होणाऱ्या घटना (सुरक्षितता) व वीजचोरी रोखण्यासाठी टप्प्याटप्प्याने एरियल बंच्‌ड केबल (एबी केबल) टाकली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सोलापूर शहरातील ९० किमीचे काम होईल आणि त्यानंतर संपूर्ण शहरात हे काम होईल.

- आशिष महेता, कार्यकारी अभियंता, महावितरण, सोलापूर

प्रिपेड मीटर म्हणजे काय?

मोबाइल रिचार्जच्या धर्तीवर आता महावितरण देखील वीजेच्यासंदर्भात प्रिपेड मीटर आणत आहे. काही महिन्यांत त्याची सुरवात होणार असून एकाचवेळी शहर-ग्रामीणमध्ये ते बसविले जातील. वीजेचा जो दर प्रतियुनिट दर आहे, त्याप्रमाणे रिचार्जमधील रक्कम कपात होईल. रात्री अचानक रिचार्ज संपल्यास लगेचच वीजपुरवठा खंडीत होणार नाही. त्या ग्राहकाला दुसऱ्या दिवशीपर्यंत रिचार्ज करण्याची संधी असणार आहे. रिचार्ज संपल्यापासून २४ तासांत रिचार्ज करणे जरूरी आहे. रिचार्ज केल्यानंतर मागील २४ तासात वापरलेल्या वीजेचे पैसे कपात होतील.

‘पीएम सुर्यघर’मध्ये १.१९ लाख ग्राहकांना संधी

‘पीएम सुर्यघर’ योजनेंतर्गत सौर ऊर्जा निर्मितीसाठी घराच्या छतावर सौर यंत्रणा बसविली जाणार आहे. योजनेतून सोलर यंत्रणा बसविणाऱ्या वीज ग्राहकांना एक किलोवॅटसाठी ३० हजार, दोन किलोवॅटसाठी ६० हजार व तीन किलोवॅटसाठी ७८ हजार रुपयांचे अनुदान आहे. ग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. सोलापूर जिल्ह्यातील एक लाख १९ हजार तर सोलापूर शहरातील २५ हजार ग्राहकांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. वीजबिलापासून कायमस्वरूपी सुटका होण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT