महाराष्ट्र बातम्या

Coronavirus : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढताहेत; अशी आहे सद्यस्थिती!

वृत्तसंस्था

मुंबई : कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. काल (मंगळवार) 729 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 9318 वर गेली आहे. तर यामध्ये 400 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यातील विशेष बाब म्हणजे काल एका दिवसात 106 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत राज्यातील 1388 रुग्णांना कोरोनावरील उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे.

कोरोना व्हायरसचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्यात आत्तापर्यंत 9318 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये एकट्या मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. आत्तापर्यंत मुंबईतील 6169 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ठाण्यात 45 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत ही संख्या जास्त आहे. यामध्ये 344 रुग्णांची नोंद झाली आहे. तर संपूर्ण ठाणे विभागात कालपर्यंत 7223 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. 

नाशिकमध्ये कमी रुग्ण

अहमदनगरमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेले 26 रुग्ण आढळले आहेत. आता त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. तसेच नाशिकमध्येही 5 रुग्णांची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोरोनाचे कमी रुग्ण आढळले आहेत.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुणे विभागात 1288 कोरोनाग्रस्त रुग्ण

पुणे विभागात रुग्णांची संख्या वाढत आहे. या विभागात कालपर्यंत 89 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. पुणे विभागात येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत कालपर्यंत 1044 रुग्णांची नोंद झाली तर 76 रुग्णांचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला. तसेच पिंपरी-चिंचवडमध्येही 72 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. तर यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. 

कोल्हापूर विभागात 48 रुग्ण

कोल्हापूर विभागात 48 रुग्ण आढळले आहेत. सांगलीमध्ये याची संख्या सर्वाधिक आहे. सांगलीमध्ये 26 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले जात आहे. तर कोल्हापूरात याची परिस्थिती तुलनेने समाधानकारक आहे. कारण कोल्हापूरात 7 रुग्णांची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT