Mask Sakal
महाराष्ट्र बातम्या

Covid-19 in Maharashtra : "मास्क बंधनकारक नसले तरी..."; आरोग्यमंत्र्यांचं राज्यातल्या जनतेला आवाहन

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. पुढच्या काही दिवसांत रुग्ण आणखी वाढण्याचा अंदाज आहे.

वैष्णवी कारंजकर

कोरोनाची साथ पसरून रुग्ण वाढण्याच्या भीतीने केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही आपली यंत्रणा सतर्क करतानाच उपायांची तयारी सुरू केली आहे. ‘सध्या मास्क बंधनकारक नसले; तरी कोरोनाच्या संशयित रुग्णांनी आणि लक्षणे आढळणाऱ्यांनी मास्क वापरण्याचे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे.

त्याच वेळी ही साथ आटोक्यात ठेवण्यासाठी संशयित रुग्णांच्या चाचण्या त्यातही ‘आरटीपीसीआर’ला प्राधान्य देण्याची सूचना सरकारने आरोग्य यंत्रणांना दिल्या आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. पुढच्या काही दिवसांत रुग्ण आणखी वाढण्याचा अंदाज आहे.

मात्र, संशयित व्यक्तींच्या चाचण्यापासून सर्व प्रकारची उपचार सुविधा वेळेत देऊन खबरदारी घेण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. त्यात चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासोबतच रुग्णांवर लक्ष ठेवून सार्वजनिक ठिकाणी काळजी घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातच यांना लक्षणे जाणवत आहेत, अशा व्यक्ती मास्क वापरून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तूर्त मास्क बंधनकारक नसला तरी, गर्दीच्या ठिकाणी तो वापरावा, असे सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, तज्ज्ञांसोबत चर्चा करून नव्या उपाय करण्यात येत आहेत. त्यादृष्टीने गावपातळीपासून शहरांपर्यंत उपाययोजना करण्याचे सरकारचे नियोजन आहे.

राज्यात १३-१४ एप्रिल्रला रोजी कोरोना मॉकड्रील

महाराष्ट्रात १३ आणि १४ एप्रिल रोजी कोरोनासाठी मॉकड्रिल घेतले जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा कोविड आढावा घेतला जाणार आहे. राज्यात सर्वेक्षण आणि परीक्षण सुरु आहे. मात्र काळजी करण्याचे कारण नाही असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.  महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. राज्यातील कोरोनाचा मृत्यूदर १.८२% आहे. राज्यात एकूण ३,५३२ सक्रिय रुग्ण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT