OBC Reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

ओबीसी आरक्षण : मागासवर्ग आयोगाकडील आरक्षणासाठीची कामे काढणार

मागासवर्ग आयोगाकडील ‘ओबीसी’च्या आरक्षणासाठीची कामे काढून घेणार असल्याचे स्पष्ट

सकाळ डिजिटल टीम

इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणासाठी निवृत्त मुख्य सचिव जयंत बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती नेमण्याची राज्याचे ओबीसी विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. मागासवर्ग आयोगाकडील ‘ओबीसी’च्या आरक्षणासाठीची कामे काढून घेणार असल्याचे स्पष्ट करीत नव्या समितीमुळे नेमकी माहिती गोळा होण्याची आशाही त्यांनी व्यक्त केली.

ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न विचारले. ओबीसींची नेमकी गोळा केली नाही, त्यासाठी मनुष्यबळ कमी होते, न्यायालयात अहवाल मांडताना घाई झाल्याचे मुद्दे दरेकर यांनी उपस्थित केले. त्यावर वडेट्टीवार यांनी सरकारची भूमिका मांडली. बांठिया समितीत निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे, हमीद पटेल, शालिनी भगत यांचा समावेश असेल.

वडेट्टीवार म्हणाले, ‘‘नव्या समितीकडून ओबीसींना आरक्षणासाठी आवश्यक माहिती एकत्रित केली जाईल. त्यासाठी समितीला सर्व अधिकार देण्यात येणार असून, सरकारकडून आवश्यक निधी आणि अन्य यंत्रणांही पुरविण्यात येईल. ज्यामुळे या घटकाला न्याय मिळेल. याआधी मागासवर्ग आयोगाला ८७ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. परंतु आरक्षणासाठीची कामे आयोगाकडून काढण्यात येतील.’’

धनगर समाजासाठी १३ योजना

धनगर समाजासाठी सुमारे दहा हजार घरे बांधण्यात येणार असून, या योजनेसाठी पुरेशा प्रमाणात निधी देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. आदिवासी समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या धर्तीवर धनगर समाजासाठी विविध १३ योजना अमलात आणल्या जाणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. या समाजातील साडेपाच हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेशासाठी मंजुरी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. धनगर समाजाच्या मागण्यांकडे महादेव जानकर, सदाभाऊ खात यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT