महाराष्ट्र

"हाफकिन'च्या कारभारामुळे औषधी पुरवठ्यात अडथळे 

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - सरकारी रुग्णालयाला औषधी पुरवठ्यासाठी स्थापन केलेल्या हाफकिन महामंडळाच्या तांत्रिक अडचणींमुळे वितरणव्यवस्था कोलमडल्याची कबुली अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी येथे दिली. तसेच मागणीनुसार पुरवठा करण्याबाबत टेंडर प्रक्रिया आहे. त्यामध्ये सुधारणा करण्यात येत असून महिनाभरात हा प्रश्‍न मार्गी लावू, असा दावाही त्यांनी केला. 

विभागीय आयुक्‍तालयात बापट यांच्या उपस्थितीत विविध विभागप्रमुखांची बैठक आज झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बापट यांना औषधी पुरवठ्यातील गोंधळावर अनेक प्रश्‍न विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, ""हाफकिनची वितरण प्रणाली व्यवस्थित करावी लागणार आहे. 12 महिने औषध पुरवठा करण्याबाबतची मागणी नोंदवून घेतली जाते. त्यानुसार पुरवठा करण्याबाबत टेंडर प्रक्रिया राबविण्यात येते. जवळपास अडीचशे कोटींच्या औषधींच्या टेंडरला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे महिनाभरात यात सुधारणा होईल.'' 

गुटखा बंदी होईना 
राज्यात गुटखा बंदी असतानाही शहरात दररोज एक ट्रक गुटखा येतो, त्यासाठी मोठी आर्थिक देवाण-घेवाण होत असल्याचा प्रश्‍न या वेळी उपस्थित करण्यात आला. त्यावर मंत्री गिरीश बापट यांनी गुटख्याबाबत राज्यात कडक कारवाई होत नसल्याचे सांगून टाकले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: तामिळनाडूमध्ये बसचा अपघात; १५ जखमी

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT