रेड झोनमध्ये 13 जिल्हे! ओमिक्रॉन अन्‌ कोरोनाचे वाढले अ‍ॅक्‍टिव्ह रुग्ण
रेड झोनमध्ये 13 जिल्हे! ओमिक्रॉन अन्‌ कोरोनाचे वाढले अ‍ॅक्‍टिव्ह रुग्ण Sakal
महाराष्ट्र

रेड झोनमध्ये 13 जिल्हे! Omicron व Corona चे वाढले अ‍ॅक्‍टिव्ह रुग्ण

तात्या लांडगे

राज्यात 4 डिसेंबर रोजी ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता. 20 दिवसांत ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 108 झाली आहे.

सोलापूर : राज्यात 4 डिसेंबर रोजी ओमिक्रॉनचा (Omicron) पहिला रुग्ण आढळला होता. 20 दिवसांत ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 108 झाली आहे. दुसरीकडे चिंता वाढवणारी बाब म्हणजे कोरोना (Covid-19) बाधित अ‍ॅक्‍टिव्ह रुग्णांची संख्या मागील 18 दिवसांत एक हजार 981 ने वाढली आहे. 7 डिसेंबर रोजी राज्यातील अ‍ॅक्‍टिव्ह रुग्णसंख्या सहा हजार 445 होती आणि 24 डिसेंबरला अ‍ॅक्‍टिव्ह रुग्णसंख्या आठ हजार 426 झाली आहे. राज्यातील (Maharashtra) 13 जिल्ह्यांमध्ये अ‍ॅक्‍टिव्ह रुग्णसंख्या 60 ते तीन हजाराहूंन अधिक आहे. (Omicron is also on the rise with corona active patients in the state)

राज्यातील 18 वर्षांवरील जवळपास नऊ कोटी 14 लाख 35 हजार व्यक्‍तींना कोरोनावरील प्रतिबंधित लस (Covid Vaccine) टोचण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. अजूनही राज्यातील एक कोटी 15 लाख व्यक्‍तींनी एकही डोस घेतला नाही. दुसरीकडे पहिला डोस टोचल्यांची संख्या पाच कोटींपर्यंत आहे. चिंतेची बाब म्हणजे राज्यात दिवसेंदिवस ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असतानाही नियमांचे तंतोतंत पालन होताना दिसत नाही. गर्दीचे कार्यक्रम कमी झालेले नाहीत. त्यामुळे राज्यात पुन्हा काही प्रमाणात निर्बंध लागू केले जाण्याची शक्‍यता असून आपत्ती व्यवस्थापन विभागाने (Disaster Management Department) त्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. परंतु, पहिल्या टप्प्यात किरकोळ स्वरूपाचे (गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध, दोन डोसशिवाय घराबाहेर पडता येणार नाही, दोन डोस घेतलेल्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश, रात्रीची जमावबंदी) निर्बंध लागू केले जातील, असेही सांगण्यात आले. तत्पूर्वी, नागरिकांनी दोन्ही डोस टोचून घ्यावेत, सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करावा, असे आवाहन केले जात आहे.

ओमिक्रॉन रुग्णांची सद्य:स्थिती...

मुंबई (Mumbai) (46), पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) (19), पुणे ग्रामीण (Pune)) (15), पुणे मनपा (7), सातारा (Satara) (5), उस्मानाबाद (Osmanabad) (5), कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivali) (2), बुलढाणा (Buldhana) (1), नागपूर (Nagpur) (2), लातूर (Latur) (1), वसई विरार (1), नवी मुंबई (1), ठाणे मनपा (Thane) (1), मीरा भाईंदर (1), नगर (Nagar) (1). यातील कर्नाटक (Karnataka), केरळ (Kerala) येथील दोन, छत्तीसगड (Chhattisgarh), गुजरात (Gujarat) येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. यातील काही रुग्ण बरे होऊन घरी परतले असून काही रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

ठळक बाबी...

  • मुंबई, पुणे, नागपूर विमानतळावर आंतरदेशीय, आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कसून तपासणी

  • राज्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण 4 डिसेंबर रोजी सापडला

  • सद्य:स्थितीत राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 108 झाली

  • राज्यात 7 डिसेंबरच्या तुलनेत 24 डिसेंबरपर्यंत कोरोना बाधित अ‍ॅक्‍टिव्ह रुग्णसंख्या वाढली

  • सध्या कोरानाचे आठ हजार 426 अ‍ॅक्‍टिव्ह रुग्ण; 18 दिवसांत वाढले एक हजार 981 अ‍ॅक्‍टिव्ह रुग्ण

राज्यातील संभाव्य निर्बंध...

  • गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध; शंभरपर्यंतच असेल मर्यादा

  • बंदिस्त हॉलमधील कार्यक्रमांवरही निर्बंध; सोशल डिस्टन्सिंगची सक्‍ती

  • दोन डोसशिवाय घराबाहेर पडता येणार नाही, दोन डोस घेतलेल्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश

  • रात्रीची जमावबंदी; पाच अथवा पाचपेक्षा अधिक व्यक्‍तींना एकत्रित फिरण्यावर बंदी

जिल्हानिहाय कोरोनाचे अ‍ॅक्‍टिव्ह रुग्ण

मुंबई (3227), ठाणे (1118), पालघर (244), रायगड (Raigad) (194), पुणे (1890), सातारा (224), सांगली (Sangli) (63), कोल्हापूर (Kolhapur) (60), सोलापूर (Solapur) (102), नाशिक (Nashik) (494), नगर (408), औरंगाबाद (Aurangabad) (77), बीड (Beed) (61) या जिल्ह्यांमध्ये अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सध्या सर्वाधिक अ‍ॅक्‍टिव्ह रुग्ण आहेत. दिलासादायक स्थिती म्हणजे गडचिरोली (Gadchiroli), चंद्रपूर (Chandrapur), गोंदिया (Gondia), भंडारा (Bhandara), वर्धा, बुलढाणा (Buldhana), वाशिम (Washim), अकोला (Akola), उस्मानाबाद (Osmanabad), हिंगोली (Hingoli), धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar), जळगाव (Jalgaon) या जिल्ह्यांमधील अ‍ॅक्‍टिव्ह रुग्णांची संख्या दहा अथवा त्याहून कमी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: तुरुंगातून बाहेत येताच केजरीवालांचं मोदींना थेट आव्हान! उद्या घेणार पत्रकार परिषद

Chhattisgarh Naxalite : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; सहा नक्षलवाद्यांचा खात्मा

Ketaki Chitale : केतकी चितळेची ठाकरेंना उद्देशून वादग्रस्त पोस्ट; म्हणाली, लाज कशी वाटत नाही...

GT vs CSK Live IPL 2024 : सीएसकेची अवस्था बिकट; डाव सावरणार मिचेल बाद

Uddhav Thackeray : ''मोदींनी डोळा मारलाय, पण मी जाणार नाही'', उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना चिमटा

SCROLL FOR NEXT