Priya Singh 
महाराष्ट्र बातम्या

Priya Singh: 'पोलिसांनी स्वाक्षरीसाठी दबाव आणला'; प्रिया सिंहचा धक्कादायक आरोप

बॉयफ्रेंडने हल्ला केल्याचा दावा करणाऱ्या प्रिया सिंहने रविवारी गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी स्वाक्षरीसाठी दबाव टाकल्याचा आरोप सिंहने केला आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- बॉयफ्रेंडने हल्ला केल्याचा दावा करणाऱ्या प्रिया सिंहने रविवारी गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी स्वाक्षरीसाठी दबाव टाकल्याचा आरोप सिंहने केला आहे. माध्यमांशी बोलताना तिने हा दावा केलाय. (On accused Ashwajit Anil Gaikwad allegedly running his car over his girlfriend Victim Priya Singh says)

प्रिया सिंह म्हणाली की, काल रात्री काही पोलीस आले होते. त्यांनी मला स्वाक्षरी करण्याची जबरदस्ती केली. मी नकार दिला, कारण त्यावेळी माझा वकील त्याठिकाणी नव्हता. माझ्या कुटुंबातील कोणी नव्हतं. उद्या काय घडेल ते पाहू, आत्ताच कागदपत्रांवर स्वाक्षरी करं अशी जबरदस्ती माझ्यावर करण्यात आली. मी स्वाक्षरी न केल्याने ते संतापले आणि निघून गेले.

मला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. मला फक्त न्याय हवा आहे, असं प्रिया सिंह म्हणाली. सिंह हिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी डीएसपी अमर सिंह जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

वरिष्ठ आयएएस अधिकारी यांचे पुत्र अश्वजित अनिल गायकवाड आणि इतर दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. प्रिया सिंह हिने आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पण, पोलिसांनी त्यास नकार दिलाय.

ठाण्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलाने आपल्या गर्लफ्रेंडवर गाडी घातल्याचा आरोप आहे. प्रिया सिंह आणि अश्वजित अनिल गायकवाड यांच्यामध्ये जवळपास चार वर्ष संबंध असल्याचं सांगितलं जातं. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप प्रिया सिंहने केलाय. तसेच अद्याप एकही अटक झाली नसल्याने पोलिसांची कार्यक्षमता आणि हेतूबाबत शंका घेतली जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Intel Layoffs 2025 : ‘इंटेल’ने घेतला मोठा निर्णय! यावर्षात तब्बल २४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

Asia Cup 2025 स्पर्धेच्या तारखा अन् ठिकाण ठरलं! ACC अध्यक्षांची घोषणा, पण भारत-पाकिस्तान सामना...

Latest Maharashtra News Updates : पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

Crime: मेव्हणीवर एकतर्फी प्रेम, साढूवर संताप; वेड्या दाजीनं दोन चिमुकल्यांना शिकार बनवलं अन्...; संतापजनक कृत्य

Kapil Patil: राष्ट्रवादीच्या खासदाराचा अजब दावा, खिल्ली उडवत माजी केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून कानउघडणी

SCROLL FOR NEXT