Road Accident Area
Road Accident Area Sakal
महाराष्ट्र

देशात दर ४ मिनिटाला एकाचा अपघाती मृत्यू! अवघे ‘हे’ पाच नियम पाळा, अपघात होणारच नाही

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्हा हा नेहमीच रस्ते अपघात व अपघाती मृत्यूमध्ये राज्यात टॉपटेनमध्ये राहिला आहे. देशात दर चार मिनिटाला एकाचा अपघाती मृत्यू होतोय. ही ओळख पुसावी या हेतूने रस्ता सुरक्षा सप्ताह पार पडला. अधिकाऱ्यांनी शहर-जिल्ह्यातील महाविद्यालयीन तरूण-तरूणींना वाहतूक नियमांचे धडे दिले. पंचसूत्री पाळा, अपघात होणारच नाही, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने आरटीओ व पोलिस अधिकाऱ्यांनी शहरातील मोठमोठ्या महाविद्यालयांमध्ये जावून विद्यार्थ्यांना अपघात होणार नाहीत, यादृष्टीने मार्गदर्शन केले. सप्ताहाची सांगता सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात झाली. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, पोलिस अधीक्षक उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संजय माळी, सिंहगडचे इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले व प्राचार्य डॉ. शंकर नवले, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक आदी उपस्थित होते. यावेळी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘रस्ता सुरक्षा कक्ष’ सुरू करण्यात आला आहे. आरटीओ अर्चना गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर व अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे ५५ अधिकारी, तसेच शहर पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांनीही या अभियानात सहभाग नोंदवला.

देशात चार मिनिटाला एकाचा मृत्यू

भारतात प्रत्येक चार मिनिटाला रस्ता अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू होत असून त्यात तरूण अधिक असल्याची बाब खूप चिंताजनक आहे. सोलापूर जिल्ह्यातील अपघात कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून जनजागृती करायला हवी. तसेच प्रत्येक वाहनचालकांनी विशेषत: महाविद्यालयीन तरूणांनी त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. पालकांनी अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन देवू नये. तरूणांनी स्वत:बरोबरच पालकांनाही वाहन चालविताना काळजी घ्यायला लावल्यास निश्चितपणे सकारात्मक बदल दिसतील. अपघातस्थळी महाविद्यालयीन तरूणांनी ‘गुड समेरिटन’ म्हणून मदत करावी, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी यावेळी केले. त्यासंबंधीचे प्रात्यक्षिक ‘बिव्हीजी’ संस्थेने सिहंगड महाविद्यालयात दाखवले.

आरटीओच्या ‘या’ अधिकाऱ्यांचे परिश्रम

परिवहन आयुक्त, सहायक आयुक्त, उपायुक्तांच्या आदेशानुसार पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे, विजय तिराणकर, मोटार वाहन निरीक्षक महेश रायबान, सुखदेव पाटील, संदीप शिंदे, सागर पाटील, शितल कुंभार, शिरीष पवावर, पल्लवी पांडव, सहायक मोटार वाहन निरीक्षक मयूर जाधव, तेजस मकरे, प्रशांत वनवे, राजकुमार देशमुख, अतुल दराडे, अक्षय जाधव, आदिका खरात ऐश्वर्या डल्लू, अमृता देशमुख, हर्षदा ढेकळे, प्रियंका माने, प्रतीक्षा नारायणकर व विद्यादेवी जाधव यांनी भारती विद्यापीठ, वि. गु. शिवदारे फार्मसी कॉलेज, सिंहगड अभियांत्रिकी, वालचंद कॉलेजसह बहुतेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे दिले.

‘हे’ नियम पाळा, अपघात होणारच नाही

  • वाहन चालवताना मद्यपान अन्‌ मोबाइल टॉकिंग नकोच

  • रस्त्याच्या विरूद्ध दिशेने वाहन चालवू नका

  • विनाहेल्मेट दुचाकी अन्‌ सीटबेल्टविना चारचाकी चालवू नका

  • वाहनांचा वेग मर्यादित ठेवा, सलग सहा-सात तास ड्रायव्हिंग नका करू

  • रस्त्याने वाहन चालवताना मागून येणाऱ्या वाहनांना अडथळा (लेनकटिंग) नको

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Chennithala : मतदारांचा कल ‘इंडिया’ आघाडीकडे

Loksabha Election 2024 : मोदी, ठाकरे, गांधी, पवार यांचीच हवा

Election Commission : निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानस्नेही कारभाराला प्राधान्य

Devendra Fadnavis : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग नगरपर्यंत नेणार

Success Story : पोरीची जिद्दच लय मोठी! अपघातात हात गमावला तरी अनामता डगमगली नाही, बोर्डात मिळवले ९२ टक्के मार्क्स

SCROLL FOR NEXT