covid 19 vaccine esakal
महाराष्ट्र बातम्या

चिंता वाढली! एक कोटी व्यक्‍तींची दुसऱ्या डोसकडे पाठ

चिंता वाढली! एक कोटी व्यक्‍तींची दुसऱ्या डोसकडे पाठ

तात्या लांडगे

16 जानेवारीपासून लसीकरण सुरू होऊनही अद्याप राज्यातील जवळपास दोन कोटी व्यक्‍तींनी एकही डोस घेतलेला नाही.

सोलापूर : राज्यातील 18 वर्षांवरील नऊ कोटी 14 लाख व्यक्‍तींनी कोरोनावरील प्रतिबंधित लस (Covid Vaccine) टोचून घेणे अपेक्षित आहे. मात्र, 16 जानेवारीपासून लसीकरण (Vaccination) सुरू होऊनही अद्याप राज्यातील जवळपास दोन कोटी व्यक्‍तींनी एकही डोस घेतलेला नाही. पहिला डोस घेऊन 28 दिवस किंवा 84 दिवस पूर्ण होऊनही एक कोटी तीन लाख व्यक्‍ती दुसरा डोस घेण्यासाठी आल्याच नाहीत. याबद्दल आरोग्य विभागाने (Department of Health) चिंता व्यक्‍त केली आहे.

कोरोनाच्या दोन्ही लाटेत राज्यातील 66 लाख 35 हजार व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी तब्बल एक लाख 41 हजार रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. दुसरी लाट ओसरल्यानंतर आता 'ओमिक्रोन' हा नवा व्हेरिएंट आला आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिबंधित लसीकरण हाच कोरोनाला रोखण्याचा ठोस उपाय असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, ज्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्‍यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले, त्या ठिकाणीच लसीकरण कमी असल्याचे समोर आले आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यांनतर कोरोना गेला, या भ्रमात लोक बिनधास्तपणे वावरु लागले आहेत. टास्क फोर्सनेही त्याबद्दल चिंता व्यक्‍त केली आहे. दुसरीकडे, लसीकरण वाढावे म्हणून दुकान, मॉलमध्ये जाण्यापूर्वीच त्या व्यक्‍तीने दोन्ही डोस टोचलेले असावेत, दोन्ही डोस घेतलेल्यांनाच सार्वजनिक वाहनातून प्रवास करता येणार आहे, शासकीय कार्यालयात दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाईल, असे निर्बंध लावले आहेत.

राज्यातील लसीकरणाची सद्य:स्थिती...

  • एकूण टार्गेट : 9.14 कोटी

  • पहिला डोस घेतलेले : 7,32,58,023

  • दोन्ही डोस घेतलेले : 3,87,59,030

  • एकही डोस न घेतलेले : 1,81,41,977

  • दुसऱ्या डोसचा कालावधी पूर्ण : 1.03 कोटी

राज्यातील दीड कोटींहून अधिक व्यक्‍तींनी अजूनपर्यंत कोरोना प्रतिबंधित लसीचा एकही डोस घेतलेला नाही. तर कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवस पूर्ण होऊनही दुसरा डोस न घेतलेल्यांची संख्या 89 लाख आहे. तर कोवॅक्‍सिनचा पहिला डोस घेऊन 28 दिवस पूर्ण झाल्यानंतरही 14 लाख व्यक्‍तींनी दुसरा डोस घेतलेला नाही.

- डॉ. सचिन देसाई, सहसंचालक, आरोग्य

मौलवी, महाराज, सेलिब्रिटींतर्फे प्रबोधन

दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोना झाला, तर तो रुग्ण सहजपणे बरा होतो, असे निरीक्षण आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह सर्वांनीच लस घेतली आहे. तरीही, राज्यातील काहीजण गैरसमजुतीतून तर काहीजण धार्मिक शिकवणुकीचा चुकीचा अर्थ काढून लस टोचून घेत नाहीत. त्यांना आता सेलिब्रिटी, मौलवी, महाराज व ज्येष्ठ राजकीय नेत्यांच्या माध्यमातून लसीकरणाचे आवाहन केले जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT