zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! राज्यातील पगारावरील एक लाख शिक्षक २३ नोव्हेंबरला देणार ‘टीईटी’; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर वरिष्ठ अधिकारी म्हणतात,...

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने २३ नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेतली जाणार आहे. राज्यातील चार लाख ७६ हजार १६४ उमेदवारांनी ‘टीईटी’साठी अर्ज केले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ‘टीईटी’साठी एक लाख १८ हजार अर्ज अधिक आले आहेत. त्यात नोकरीवरील सुमारे एक लाख शिक्षक आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने २३ नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेतली जाणार आहे. राज्यातील चार लाख ७६ हजार १६४ उमेदवारांनी ‘टीईटी’साठी अर्ज केले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ‘टीईटी’साठी एक लाख १८ हजार अर्ज अधिक आले आहेत. त्यात नोकरीवरील सुमारे एक लाख शिक्षक आहेत.

फेब्रुवारी २०१३ पासून शिक्षक भरतीसाठी पहिली ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षकांसाठी ‘टीईटी’ बंधनकारक करण्यात आली आहे. त्यापूर्वी मात्र ‘टीईटी’ची अट नव्हती. तरीपण, सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने ५२ वर्षांपर्यंतच्या सर्वच शिक्षकांसाठी ‘टीईटी’चे बंधन घातले. त्यावेळी ‘टीईटी’ची अट नसताना आता आम्ही ती परीक्षा का द्यायची?, असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

शिक्षक संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्र्यांनाही निवेदने दिली आहेत. मात्र, अजूनही पुनर्विचार याचिका दाखल झालेली नाही. या पार्श्वभूमीवर राज्यातील पगारावरील शिक्षकांनी देखील ‘टीईटी’ देण्याची तयारी दर्शवत अर्ज केले आहेत. दरम्यान, स्थानिक स्वराज संस्थांची निवडणूक जरी जाहीर झाली, तरी परीक्षेच्या आदल्या दिवशी व परीक्षेदिवशी परीक्षार्थी शिक्षक व परीक्षेसाठी नियुक्त शिक्षकांचे कोणतेही प्रशिक्षण असणार नाही. याची खबरदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतली आहे.

परीक्षा केंद्रे निश्चिती अंतिम टप्प्यात

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २३ नोव्हेंबरला होणार असून परीक्षा केंद्रे निश्चितीची कार्यवाही सध्या सुरू आहे. राज्यभरातून चार लाख ७६ हजार १६४ उमेदवारांचे परीक्षेसाठी यंदा अर्ज आले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास एक लाखांवर अर्ज जास्त आले आहेत.

- डॉ. नंदकुमार बेडसे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अन्‌ अधिकारी म्हणतात...

सर्वोच्च न्यायालयाने इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवर नेमणूक झालेल्या शिक्षकांना, ज्यांचे वय ५२ वर्षांपर्यंत आहे त्या सर्वांसाठी ‘टीईटी’ बंधनकारक असल्याचे आदेश दिले आहेत. दोन वर्षात परीक्षा उत्तीर्ण न होणाऱ्यांवर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद आहे. यावर राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करेल आणि आपल्याला न्याय मिळेल, अशी अपेक्षा शिक्षकांना आहे. पण, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो. त्यावर राज्य सरकार वेगळी भूमिका घेऊ शकत नाही, असे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे राज्यातील पगारदार शिक्षकांनी देखील ‘टीईटी’साठी अर्ज केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Army Attack : बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानी सैन्यावर पुन्हा दहशतवादी हल्ला; सलग दुसऱ्या दिवशी पाच सैनिक ठार

असरानीवर घाईघाईत का करण्यात आले अंत्यसंस्कार? 'ही' होती त्यांची शेवटची इच्छा, मॅनेजरने केला खुलासा

Gold Rate Today : लक्ष्मीपूजनादिवशी सोन्याच्या भावात मोठा बदल, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Mangalvedha News: 'मंगळवेढ्यात काँग्रेसचे पिठले भाकरी आंदोलन'; शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत दिवाळीपूर्वी न मिळाल्याचा निषेध

Lakshmi Pujan : लक्ष्मीपूजन दिवशी चुकूनही करू नका 'या' 3 गोष्टी, नाहीतर माता लक्ष्मी अन् कुबेर देव दोघेही होतील नाराज

SCROLL FOR NEXT