कांदा दर sakal
महाराष्ट्र बातम्या

कांदा प्रतिक्विंटल १३०० ते ३२०० रुपये! सोलापूर बाजार समितीत डिसेंबरमध्ये ६७४२ गाड्या आवक; व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना १५-२० दिवसांच्या मुदतीचा धनादेश

सोलापूरसह कर्नाटक, बीड, धाराशिव, सांगली, कोल्हापूर, पुणे येथून कांदा सोलापूर बाजार समितीत विक्रीसाठी येत आहे. सोमवारी सोलापूर बाजार समितीत ५३५ गाड्या कांद्याची आवक होती. दिलासादायक बाब म्हणजे, दोन दिवसांच्या तुलनेत सोमवारी कांद्याचा दर ३०० रुपयांची वधारला होता. कांद्याला प्रतिक्विंटल किमान १३०० ते कमाल ३२०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूरसह कर्नाटक, बीड, धाराशिव, सांगली, कोल्हापूर, पुणे येथून कांदा सोलापूर बाजार समितीत विक्रीसाठी येत आहे. सोमवारी (ता. २९) सोलापूर बाजार समितीत ५३५ गाड्या कांद्याची आवक होती. दिलासादायक बाब म्हणजे, दोन दिवसांच्या तुलनेत सोमवारी कांद्याचा दर ३०० रुपयांची वधारला होता. कांद्याला प्रतिक्विंटल किमान १३०० ते कमाल ३२०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

संक्रांत, पोंगल सणाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी कांदा घेऊन ठेवतात. सणामुळे ते काही दिवस गावाकडेच असतात. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर देखील कांद्याचा भाव सोमवारी वाढल्याचे दिसून आले. बंगळूर बाजारात कांद्याला १८०० ते ३९०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. विकलेल्या कांद्याचे पैसे लगेचच मिळतात. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी कांदा बंगळूरला नेत आहेत. सोलापूर बाजार समितीत देखील समाधानकारक भाव मिळत असल्याने आवक वाढली आहे.

मागील दहा दिवसांत चार हजारांहून अधिक गाड्यांची आवक सोलापूर बाजार समितीत राहिली आहे. सकाळी १० वाजता लिलावाला सुरवात होते. विशेष बाब म्हणजे, सोलापूर बाजार समितीत मुख्य व्यापाऱ्याअंतर्गत (गाळेधारक) अनेकजण कांद्याचा व्यवहार करतात. अनेकांकडून शेतकऱ्यांना पैसे दिले जात नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारून देखील एकरकमी पैसे दिले जात नाहीत, असेही अनुभव शेतकरी सांगतात. त्याकडे बाजार समिती प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना १५-२० दिवसांच्या मुदतीचा धनादेश

अतिवृष्टीचा फटका सोसून जतन केलेला कांदा विक्रीसाठी शेतकरी बाजार समितीत आणतो. रोख स्वरूपात पैसे मिळाल्यावर खते-बियाणे, मशागतीचे व कांदा लागण, काढणीचा हिशेब चुकता करता येईल, असे त्यांचे नियोजन असते. मात्र, बाजार समितीत आल्यावर १० हजारांपर्यंत उचल दिली जाते आणि उर्वरित पैसे १५ ते २० दिवसांनी दिले जातात. त्याचा धनादेश मुदत टाकून दिला जातो, असे चित्र पाहायला मिळते.

डिसेंबरमधील आवक

  • एकूण गाड्या

  • ६,७४२

  • एकूण उलाढाल

  • ७७.१९ कोटी

  • किमान भाव

  • ७०० ते १३००

  • कमाल भाव

  • १७०० ते ३२००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT