Onion Prices, solapur APMC

 
sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर बाजार समितीत विकला ३०० कोटींचा कांदा! साडेतीन महिन्यांत ‘या’ जिल्ह्यांतून २९,६३१ गाड्या आवक, जानेवारीपासून भाव ७०० ते २४०० रुपयांपर्यंतच

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामात १ नोव्हेंबर २०२५ ते १७ फेब्रुवारी २०२६ या काळात तब्बल ३०० कोटींचा कांदा विकला गेला आहे. साडेतीन महिन्यांत सोलापूर बाजार समितीत २९ हजार ६३१ गाड्या कांदा विकला गेला. यंदाच्या हंगामात समाधानकारक भाव नसताना देखील उलाढाल ३०० कोटींपर्यंत झाल्याचे बाजार समितीकडील नोंदीवरून दिसते.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामात १ नोव्हेंबर २०२५ ते १७ फेब्रुवारी २०२६ या काळात तब्बल ३०० कोटींचा कांदा विकला गेला आहे. साडेतीन महिन्यांत सोलापूर बाजार समितीत २९ हजार ६३१ गाड्या कांदा विकला गेला. यंदाच्या हंगामात समाधानकारक भाव नसताना देखील उलाढाल ३०० कोटींपर्यंत झाल्याचे बाजार समितीकडील नोंदीवरून दिसते. अतिवृष्टी, सीना नदीच्या महापुरानंतरही कांद्याची आवक यंदा लक्षणीय होती.

मंगळवारी (ता. १७) सोलापूर बाजार समितीत ३७५ गाड्या कांदा आला होता. सर्वाधिक दर प्रतिक्विंटल दोन हजार रुपये तर सरासरी भाव अवघा आठशे रुपये होता. दरम्यान, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात कांद्याला चांगला भाव मिळाला. या दोन महिन्यांत शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २३०० ते ३७०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. त्यातून दोन महिन्यांत सव्वाशे कोटींची उलाढाल झाली. जानेवारी व फेब्रुवारीत मात्र भावात मोठी घसरण झाली.

आवक वाढली, पण भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांना ‘ना नफा - ना तोटा’ तत्त्वानुसार कांदा विकावा लागला. मागील दीड महिन्यांत कांद्याला प्रतिक्विंटल ७०० ते २४०० रुपयांपर्यंतच भाव मिळाला. दुसरीकडे, शेतकऱ्यांना रोखीने पैसे मिळालेच नाहीत. १५ ते २० दिवसांच्या मुदतीचे धनादेश घेऊन शेतकऱ्यांना गावी परतावे लागले. आता कांद्याची आवक कमी झाली आहे, तरीपण भावात सुधारणा दिसत नाही.

साडेतीन महिन्यांतील आवक, उलाढाल

  • महिना आवक उलाढाल

  • नोव्हेंबर ३,८७६ गाड्या ३६ कोटी

  • डिसेंबर ८,७८३ गाड्या ९१ कोटी

  • जानेवारी १२,१३४ गाड्या ११७ कोटी

  • फेब्रुवारी ५,८३८ गाड्या ४७ कोटी

  • एकूण २९,६३१ गाड्या २९१ कोटी

सोलापुरात ‘या’ जिल्ह्यांतून आला कांदा

नाशिकनंतर कांद्याच्या उलाढालीत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचाच क्रमांक लागतो. यंदाच्या हंगामात सोलापूर बाजार समितीत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, मंगळवेढा, मोहोळ, माढा, करमाळा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, सांगोला या तालुक्यांतून कांदा विक्रीसाठी आला होता. याशिवाय धाराशिव, बीड, पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगलीसह कर्नाटकातील विजयपूर, कलबुर्गी येथील शेतकऱ्यांनीही कांदा विक्रीसाठी सोलापूर बाजार समितीत आणला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT