'ओमिक्रॉन'ला ऑक्‍सिजन लागलाच नाही! राज्यात 24509 अ‍ॅक्‍टिव्ह रुग्ण Sakal
महाराष्ट्र बातम्या

तिसरी लाट सुरू? पुढील टप्प्यातील ठरले निर्बंध; असे असतील कडक नियम

तिसरी लाट सुरू? पुढील टप्प्यातील ठरले निर्बंध; असे असतील कडक नियम

तात्या लांडगे

सक्रिय रुग्णांपैकी केवळ पाच टक्‍केच रुग्णांना ऑक्‍सिजनची गरज लागत आहे. ओमिक्रॉनच्या एकाही रुग्णाला ऑक्‍सिजन लागलेला नाही.

सोलापूर : राज्यात दहा दिवसांत कोरोनाचे (Covid-19) सक्रिय रुग्ण 18 हजारांनी तर ओमिक्रॉनचेही रुग्ण 389 ने वाढले. दिलासादायक बाब म्हणजे, सक्रिय रुग्णांपैकी केवळ पाच टक्‍केच रुग्णांना ऑक्‍सिजनची (Oxygen) गरज लागत आहे. ओमिक्रॉनच्या (Omicron) एकाही रुग्णाला ऑक्‍सिजन लागलेला नाही. तरीही, रुग्ण वाढणाऱ्या 12 जिल्ह्यांवर विशेष वॉच आहे. त्या ठिकाणी रुग्ण वाढल्यास निर्बंध आणखी कडक होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. (Only five percent of patients infected with Omicron needed oxygen)

राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सातारा, नगर, नाशिक, सांगली, नागपूर, सोलापूर, औरंगाबाद येथे रुग्ण वाढत आहेत. काही जिल्ह्यांमधील 20 टक्‍के व्यक्‍तींनी अजूनही प्रतिबंधित लस टोचलेली नाही. तिसरी लाट थोपविण्यासाठी राजकीय पक्षांचे मेळावे, आंदोलने, बाजारपेठांमधील गर्दी, विवाह समारंभ, अंत्यसंस्कार अशा कार्यक्रमांवरील निर्बंध पुढे कडक होतील. 16 जानेवारी 2020 पासून आजपर्यंत जवळपास 80 लाखांहून अधिक व्यक्‍तींनी प्रतिबंधित लस (Covid Vaccine) टोचलेली नाही. ते लोक कोरोनाचे वाहक ठरू नयेत म्हणून सूक्ष्म नियोजन केले आहे. पुन्हा कडक लॉकडाउन (Lockdown) करण्याची वेळ येणार नाही, यासाठी प्रत्येकांनी खबरदारी घ्यावी, असेही आरोग्यमंत्री म्हणाले. आपल्याकडे पीपीई कीट (PPE Kit), टेस्टिंग किट, ऑक्‍सिजन, साधे व ऑक्‍सिजन बेड्‌स, व्हेंटिलेटर, डॉक्‍टर्स आणि औषधांची पुरेशी उपलब्धता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी (ता. 31) चार महिन्यातील सर्वाधिक आठ हजार 67 रुग्णांची नोंद झाली.

गर्दीतून कोरोना, ओमिक्रॉनचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध घातले असून रुग्ण वाढले तर अशा कार्यक्रमांवर बंदी घातली जाईल. सरसकट लॉकडाउन केला जाणार नसून पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्ण वाढतील, त्या ठिकाणचे निर्बंध कडक होतील.

- राजेश टोपे, आरोग्यमंत्री

कोरोना रुग्णांसाठी सध्या 80 मे. टन ऑक्‍सिजन

कोरोनाच्या दोन्ही लाटांच्या अनुभवांनंतर अत्यावश्‍यक प्रसंगात परराज्यातून ऑक्‍सिजन मागविण्याची वेळ येऊ नये म्हणून ठोस उपाययोजना केल्या आहेत. लिक्‍विड ऑक्‍सिजन निर्मितीच्या ठिकाणी 13 हजार 900 मे. टन तर विभागीय स्तरावरील रिटेलरकडे तीन हजार मे. टन आणि जिल्हास्तरावर तीन हजार मे. टन ऑक्‍सिजन एकाचवेळी साठवण्याची क्षमता निर्माण केली आहे. उत्पादनही वाढविले असून जिल्हा स्तरावर हवेतून ऑक्‍सिजन तयार करणारे 330 प्रकल्प उभारण्यात आले आहेत. सध्या कोरोना रुग्णांसाठी 80 मे. टनापर्यंत तर नॉनकोविडसाठी 200 मे. टनापर्यंतच ऑक्‍सिजन पुरविला जात आहे.

राज्यातील संभाव्य निर्बंध...

  • पहिली ते अकरावीपर्यंतच्या शाळा (दहावी-बारावी वगळून) होतील बंद

  • हॉटेल, मॉल्समध्ये दोन डोसशिवाय प्रवेश नाहीच; पार्सल सेवेला प्राधान्य

  • गर्दीच्या कार्यक्रमांवर 100 टक्‍के निर्बंध; धार्मिक स्थळांचाही होणार विचार

  • मुंबई लोकल बंद होऊ शकते; सरकारी, खासगी आस्थापनातील उपस्थिती राहील मर्यादित

  • रुग्ण वाढणाऱ्या ठिकाणी आठवड्यातून दोन दिवस कडक संचारबंदी; प्रवासी वाहतुकीवरही निर्बंध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Reality Explained: नेपाळ सरकारचं खरंच चुकलं की Gen Z चा अभ्यास कमी पडला? खरं वास्तव काय?

आनंदाची बातमी! 'साेलापूर जिल्ह्यात पाेलिस दलात २२५ पदांची भरती'; सप्टेंबरअखेर भरा अर्ज, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ‘मैदानी’चे नियोजन

Who is Sushila Karki? सुशीला कार्की नेपाळच्या प्रमुखपदी? भारतासाठी आनंदाची बातमी की नवी डोकेदुखी? संबंध कसे असतील?

Gokul Dudh Politics : गोकुळ दूध संघात सत्ता महायुतीची; वर्चस्व मात्र हसन मुश्रीफ- सतेज पाटील यांचेच, महाडिक -मंत्री मुश्रीफ यांच्यात नवा वाद...

हा तर फक्त सामना! भारत-पाकिस्तान मॅच रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

SCROLL FOR NEXT