Education Sakal
महाराष्ट्र बातम्या

बारावीनंतर २ वर्षातच डिप्लोमा इंजिनिअर होण्याची संधी! शासकीय तंत्रनिकेतनमध्ये थेट दुसऱ्याच वर्षाला प्रवेश; अर्ज करण्याची मुदत ३ जुलैपर्यंत

बारावीनंतर अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या पूर्णवेळ थेट द्वितीय वर्ष पदविकेची प्रवेश प्रक्रिया बुधवारी सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना ३ जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. यामध्ये थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमांच्या वर्किंग प्रोफेशनल्स उमेदवारांच्या स्वतंत्र तुकडीची प्रवेश प्रक्रिया समाविष्ट आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता बारावीनंतर अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या पूर्णवेळ थेट द्वितीय वर्ष पदविकेची प्रवेश प्रक्रिया बुधवारी (ता. १२ जून) सुरू झाली आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना ३ जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. यामध्ये थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमांच्या वर्किंग प्रोफेशनल्स (कार्यरत व्यावसायिक) उमेदवारांच्या स्वतंत्र तुकडीची प्रवेश प्रक्रिया समाविष्ट केलेली आहे.

डिप्लोमाच्या थेट द्वितीय पदविकेसाठी विद्यार्थ्यांना ३ जुलैपर्यंत अर्ज करता येतील. पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी ५ जुलैला प्रसिद्ध होईल. यादीसंदर्भात काही आक्षेप असल्यास विद्यार्थ्यांना ६ ते ०९ जुलैपर्यंत मुदत आहे. अंतिम गुणवत्ता यादी ११ जुलैला जाहीर होईल. सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४०० रुपये तर राखीव प्रवर्गासाठी ३०० रुपयांचे अर्जाचे शुल्क आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासंदर्भातील माहिती https://dsd24.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना करिअरची संधी

शासकीय तंत्रनिकेतन सोलापूरचा इन्स्टिट्यूट कोड ६०१७ असून संस्थेत सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, कॉम्पुटर इंजिनिअरिंग व माहिती तंत्रज्ञान इंजिनिअरिंग असे विविध अभ्यासक्रम शिकविले जातात. बारावीनंतर केवळ दोन वर्षात व अत्यल्प शैक्षणिक खर्चात तांत्रिक कौशल्यावर आधारित रोजगाराभिमुख शिक्षण देऊन डिप्लोमा इंजिनिअर होण्याची विद्यार्थ्यांना या माध्यमातून संधी मिळणार आहे. प्रवेश प्रक्रिया संस्थेचे प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी वेळेत करावेत अर्ज

बारावीनंतर अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या पूर्णवेळ थेट द्वितीय वर्ष पदविका प्रवेशाची प्रक्रिया बुधवारपासून सुरू करण्यात आली आहे. शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर या संस्थेत सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, कॉम्पुटर इंजिनिअरिंग व माहिती तंत्रज्ञान इंजिनिअरिंग असे विविध अभ्यासक्रम शिकविले जातात. इच्छुक विद्यार्थ्यांनी मुदतीत अर्ज करावेत.

- डॉ. अशोक उपाध्याय, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT