Ajit Pawar Sambhajiraje Chhatrapati Sakal
महाराष्ट्र बातम्या

अजित पवारांचं विधान चुकीचं, संदर्भ द्या; संभाजीराजे छत्रपतींचा संताप

अजित पवार अर्धसत्य बोलले, अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी मांडली असून त्या विधानाचा निषेध केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीमहाराज यांच्याविषयी केलेल्या एका विधानामुळे वादंग निर्माण झाला आहे. भाजपा या विधानाचा निषेध करत आहे. अशातच आता छत्रपतींचे वारसदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका मांडली आहे.

संभाजीराजे आज माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, "मी संभाजीमहाराज यांना स्वराज्यवीर, धर्मवीर असं नेहमीच म्हटलंय. अजित पवारांनी कोणता संदर्भ देऊन विधान केलं, स्पष्ट करा. ऐतिहासिक संदर्भ, घटना बोलायची असेल तर अभ्यास न करता प्रतिक्रिया देऊ नये. अजित पवार अर्धसत्य बोलले, त्यांचं विधान चुकीचं. स्वराज्यरक्षक बोलले तर बरोबर आहे. पण धर्मवीर नव्हते हे चुकीचं आहे."

अजित पवार यांनी सभागृहात बोलताना अभ्यास करुनच बोलायला हवं, असा सल्लाही संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. तसंच संभाजीमहाराज स्वराज्यरक्षकही होते आणि धर्मवीरही होते, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. या वक्तव्याबद्दल त्यांनी अजित पवारांचा निषेधही केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'दुपारी १.११ वाजता बॉम्बस्फोट'... विधानभवनाला धमकीचा ई-मेल, सुरक्षा यंत्रणांची धावपळ

Ben Stokes Retirement Reason: ऑस्ट्रेलियात नेमकं काय घडलं? बेन स्टोक्सने निवृत्तीचं खरं कारण सांगितलं म्हणाला माझ्यात आता...

Nagpur Crime: प्रेयसीने बोलणे बंद केलं, प्रियकराने रचला कट; नागपुरात धक्कादायक प्रकार, एमडीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न अन्..

Latest Marathi News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, कार अन् पिकअपची धडक

Alandi Property Tax: आळंदीतील चतुर्थ वार्षिक करवाढीवर 748 हरकती; उद्या नगरपरिषदेत दिवसभर सुनावणी

SCROLL FOR NEXT