Vittal Rukmini pandharpur Sakal
महाराष्ट्र बातम्या

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची विठ्ठलभक्तांची प्रतीक्षा लवकरच संपणार

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर - विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची विठ्ठलभक्तांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. पुढील महिन्यापासून म्हणजे जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरू होण्याची शक्यता आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

महिनाअखेर काम पूर्ण होईल आणि जूनपासून विठुरायाचे पदस्पर्श सुरू होईल, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आज ‘सकाळ’शी बोलताना दिली.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला मूळ रूप देण्यासाठी राज्य सरकारने सुमारे ७४ कोटी रुपयांचा मंदिर विकास आराखडा मंजूर केला आहे. पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली १५ मार्चपासून हे काम सुरू आहे. मंदिराचे काम सुरू असल्याने भाविकांसाठी विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद आहे. पहाटे सहा ते सकाळी अकरा वाजेपर्यंत मुखदर्शन सुरू आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सहकाऱ्याने मंदिराच्या कामासाठी निधी मिळाला आहे. राज्य सरकारच्या सहकार्यामुळेच भव्य, देखणे विठ्ठल मंदिर लवकरच खुले होणार आहे, अशी माहिती औसेकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs SA: बाबर आझमला फॉर्म सापडेना! टोनी डी झोर्झीने एका हाताने अफलातून कॅच घेत धाडलं माघारी, पाहा Video

Rahul Gandhi preparing sweets Video : राहुल गांधींनी तळली इमरती अन् बनवले बेसनाचे लाडू ; दुकानदार म्हणाला ‘’आता फक्त..’’

Bacchu Kaduचं वादग्रस्त विधान, Dattatray Bharne बघा काय म्हणाले? | Sakal News

'जयाने जर पांढरी साडी घातली...', अमिताभ बच्चन यांच्या आई निर्मात्याला म्हणाल्या.... 'तुझं जगणं...'

Diwali Offer : १०० रुपयांचा रिचार्ज करा अन् Silver Coin जिंका, 'या कंपनीची भन्नाट ऑफर, आज शेवटचा दिवस...

SCROLL FOR NEXT