pankaja munde
pankaja munde esakal
महाराष्ट्र

तुम मुझे कबतक रोकोगे, पंकजा मुंडे भगवान गडावरून कडाडल्या

सकाळ डिजिटल टीम

बीड : आज कुठल्याही पक्षाचं राजकारण नाही..हा मेळावा केवळ लोकांना दिशा देण्यासाठी आहे. तुम मुझे कबतक रोकोगे...अशी कविता ऐकवत खास शैलीत पंकजा मुंडे यांनी जनतेला संबोधित केले. या मेळाव्याला जशी आई मुलाची दृष्ट काढते. तसा मी तुमच्यावरून पदर ओवाळला. वेळ आली तर तुमच्यावर जीव सुध्दा ओवाळून टाकेन, तुमच्याशिवाय कोण आहे मला... असेही यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या. आज १५ ऑक्टोबरला दसऱ्यानिमित्त भगवान गडावर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल दोन वर्षानंतर हा दसरा मेळावा साजरा केला जातोय. तसेच गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणासंबंधी भाजप नेत्या पंकजा मुंडे (bjp leader pankaja munde) चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे आज पंकजा मुंडे तोफ कोणावर धडाडणार? याकडे सर्वांच लक्ष आहे

कविता ऐकवत खास शैलीत पंकजा मुंडेंनी भगवानगडावरून जनतेला संबोधित केले

मुठ्ठी में कुछ सपने लेकर, भरकर जेबों में आशाएं ।

दिल में है अरमान यही, कुछ कर जाएं… कुछ कर जाएं… ।

सूरज-सा तेज़ नहीं मुझमें, दीपक-सा जलता देखोगे..

सूरज-सा तेज़ नहीं मुझमें, दीपक-सा जलता देखोगे…

अपनी हद रौशन करने से,

तुम मुझको कब तक रोकोगे…

तुम मुझको कब तक रोकोगे… । ।

आपलं मंत्रीपद भाड्याने दिले - पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर घणाघात

शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्यानं त्यांनी आघाडी सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या की, शेतकऱ्यांसाठी काही बजेट आहे का? कुणाला मदत सुरु आहे का? सगळं बंद आहे पण... पण त्यांची वसुली सुरुय ना.. यांनी मंत्रिपद भाड्याने दिल्याचा घणाघात पंकजा मुंडे यांनी केला.

तुम्ही चांगलं काम करा असं आमचं म्हणणं आहे. जनतेच्या हिताचं काम करा जाहीर अभिनंदन करू. पण राज्यात परिस्थिती काय आहे? दररोज बलात्काराच्या बातम्या ऐकायला मिळतात. अशा घटना बघून कसं गप्प बसावं वाटतं? असा सवाल पंकजा मुंडे यांनी विचारला.

मराठा आणि ओबीसी समाजासाठी लढणार

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय गळ्यात हार घालणार नाही. ओबीसी ,समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय डोक्याला फेटा बांधणार नाही असे सांगत पंकजा मुंडे यांनी जनतेला विश्वास दिला.

विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी आपआपाल्या भूमिका पार पाडाव्यात

तीन पक्षांच्या सरकारमध्ये एकमेकांना खूश करताना जनतेचं नुकसान होत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे जनतेसाठी काही चांगल्या घोषणा करतील अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या. विरोधी पक्षातील प्रत्येक नेता म्हणतो की हे सरकार पडणार आणि सत्ताधारी म्हणतात सरकार मजबूत आहे. पण जनतेसाठी काय करता याच्यावर बोला. गुन्हेगारीविरोधात काय करता. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या भूमिका नीट पार पाडाव्यात असंही पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटलं.

भागवत कराडही उपस्थित

पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान गडावरील १२ एकर परिसरात पार पडत आहे. आज सकाळीच खासदार प्रितम मुंडे यांनी भगवान गडावर जाऊन दर्शन घेतले. तसेच गोपीनाथ मुंडे यांची नेहमीच आठवण येत असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, भागवत कराड यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे या नाराज असल्याचे बोलले जात होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट देखील घेतली. तसेच पंकजा मुंडे यांचे समर्थक देखील नाराज होते.

भगवानगड दसरा मेळावा चर्चेत

पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) भगवानगड दसरा मेळावा प्रत्येक वेळेस कुठल्या तरी एका कारणामुळे चर्चेत असतो. अर्थातच हे कारण राजकीय जास्त असतं. त्यामुळे चर्चा तर होणारच. आजचा दसरा काय खास असेल याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहेच. त्यातही केंद्रीय मंत्री झालेले आणि कधी काळी दसऱ्याचं स्टेज सांभाळणारे भागवत कराड हजेरी लावणार की नाही याची चर्चा सुरु होती. त्यातच काही दिवसांपूर्वी, आता मी केंद्रीय मंत्री झालोय, त्यामुळे बघावं लागेल असं म्हणून कराडांनी कहानीत ट्विस्ट आणलेला होता. पंकजा मुंडेंसोबतच्या त्यांच्या मतभेद-नाराजीच्या पार्श्वभूमीवर कराडांच्या वक्तव्यानं जास्तच उत्सुकता निर्माण केली. पण शेवटी भागवत कराड हे सावरगावच्या भगवान भक्तीगडावर येणार असल्याचं स्पष्ट झालंय. ते औरंगाबादहून परळीला येतील. गोपीनाथगडावरून ते हेलिकॉप्टरनं पंकजांसोबत सावरगावच्या दसरा मेळाव्याला पोहोचत आहे.

गोपीनाथ मुंडेंनी सुरू केली दसरा मेळाव्याची प्रथा

गोपीनाथ मुंडे यांनी भगवान गडावर दसरा मेळाव्याची प्रथा सुरु केली. तेव्हा भागवत कराड हे सामान्य कार्यकर्ता होते. तेव्हा संपूर्ण दसरा मेळाव्याचे नियोजन, स्टेजची तयारी, कार्यकर्त्यांचे नियोजन ही सर्व व्यवस्था भागवत कराड यांनी सांभाळली होती. आता मात्र केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवल्यावर डॉ. कराड हे स्वतः दसरा मेळाव्याच्या व्यासपीठाची शोभा वाढवणार आहेत. पंकजा मुंडेंप्रमाणेच डॉ. भागवत कराडदेखील या भाषणात काय बोलतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT