pankaja munde pankaja munde
महाराष्ट्र बातम्या

Jan Ashirwad Yatra: पंकजा म्हणाल्या, माझी कोणतीही नाराजी नाही...

जनआशिर्वाद यात्रेच्या अगोदर मंत्री कराड, पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंसह भाजप कार्यकर्त्यांनी वैद्यनाथ मंदिराचे दर्शन घेतले

प्रमोद सरवळे

मागील काही दिवसांत प्रितम मुंडेंना मंत्रीपद न मिळल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होती. याप्रसंगी पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी नाराजीही व्यक्त केली होती

बीड: Jan Ashirwad Yatra parali: मोदी सरकारमध्ये महाराष्ट्रातील नव्याने वर्णी लागलेले चार मंत्री आजपासून राज्यात जनआशिर्वाद यात्रा सुरू करत आहेत. यामध्ये अर्थराज्यमंत्री भागवत कराड (bhagwat karad) हे बीडमधील परळीतून या यात्रेला सुरूवात करणार आहेत. मंत्री कराड यांच्या यात्रेला गोपीनाथगडावर पंकजा मुंडे हिरवा कंदील दाखवणार आहेत. मागील काही दिवसांत प्रितम मुंडेंना मंत्रीपद न मिळल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होती. याप्रसंगी पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी नाराजीही व्यक्त केली होती. काही सदस्यांनी राजीनामेही दिले होते. त्यावर बोलताना आज पंकजा मुंडेंनी खुलासा करत सांगितले की, 'माझी कोणतीही नाराजी नसून आम्ही सर्व मिळून काम करत आहोत.'

जनआशिर्वाद यात्रेच्या अगोदर मंत्री कराड, पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंसह भाजप कार्यकर्त्यांनी वैद्यनाथ मंदिराचे दर्शन घेतले. मंदिर बंद असल्याने त्यांनी पायरीवरच आरती केली आहे. आज या जनआशिर्वाद यात्रेला पंकजा मुंडें हिरवा कंदिल दाखवणार आहेत. जनआशिर्वाद यात्रा ही देशातील १४२ मतदारसंघातून जाणार असल्याची माहितीही पंकजा मुंडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT