pankaja munde ganpati darshan at devendra fadnavis house
pankaja munde ganpati darshan at devendra fadnavis house  esakal
महाराष्ट्र

पंकजा मुंडे यांना प्रसादरुपी सत्तेत संधी मिळेल का? फडणवीसांच्या गणपतीचे घेतले दर्शन

धनश्री ओतारी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात पंकजा मुंडे यांना स्थान न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाले. पंकजा मुंडे यांना सुरुवातीला विधान परिषद उमेदवारी आणि आता मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सातत्याने पुढे येत आहे. अशातच काल (गुरुवारी) त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या गणरायाचे दर्शन घेतले.(pankaja munde ganpati darshan at devendra fadnavis house)

मागच्या अडीच वर्षांत राज्यसभा, विधान परिषद आणि परवाच्या मंत्रीमंडळ विस्तारात नावाची चर्चा असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना संधी मिळाली नाही. आता पुन्हा मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा आहे. आता तरी पंकजा मुंडे यांना संधी मिळेल का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. दरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गणपतीचे दर्शन घेतले आहे. त्यामुळे दोघांमधील कटुता कमी होईल का? असे सवाल कार्यकर्यांमध्ये उपस्थित होत आहे.

मुंडे यांनी काल फडणवीसांच्या घरी बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी फडणवीस नसले तरी पंकजा मुंडे व अमृता फडणवीस यांच्यात संवाद झाला. आता मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे हे निश्चित आहे. आताच्या मंत्रीमंडळात एकही महिला नाही. भविष्यातील विस्तारात महिलेचा सहभाग होईल हे निश्चित आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना प्रसादरुपी सत्तेत संधी मिळेल का ? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

रक्षाबंधनदिवशी पंकजा मुंडेंची नाराजी उघड

ज्यावेळेस मंत्रिमंडळ बनत असतं त्यावेळेस सर्वांना समाधानी करणं शक्य नसतं. त्यामुळे जे मंत्री झाले त्यांनी तरी लोकांचा समाधान करावं अशा शुभेच्छा मी नव्या मंत्र्यांना देऊन झालेली आहेत. तसेच मी चर्चेत राहणारच नाव आहे, मात्र अजून त्यांना माझी पात्रता वाटत नसेल, त्यामुळे मला मंत्रीपद दिलं नसेल, जेव्हा त्यांना माझी पात्रता वाटेल तेव्हा देतीलही कदाचित, त्याबद्दल मला काही अपक्षेप नाही, या चर्चा मीडियातून होतात आणि कार्यकर्त्यातून होतात अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी मंत्रीपदावरती व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

Anjali Arora: कच्चा बदाम गर्ल अंजली अरोरा साकारणार सीतेची भूमिका; म्हणाली, "साई पल्लवीसोबत जर तुलना झाली तर..."

SCROLL FOR NEXT