pankaja munde pankaja munde
महाराष्ट्र बातम्या

'ओबीसी आरक्षणाचा विषय सोडून निवडणुका जाहीर करणे धक्कादायक'

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय मार्गी लागल्याशिवाय आम्ही निवडणुका होऊ देणार नाही

प्रमोद सरवळे

बीड: ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा (OBC Political Reservation) विषय अत्यंत संवेदनशील असताना या निवडणुका जाहीर होणं हा ओबीसींवर घोर अन्याय आहे, असं मत भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी त्यांच्या फेसबूक पोस्टमधून मांडलं आहे. सध्या राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय अत्यंत संवेदनशील होत असताना राज्य निवडणूक आयोगाकडून धुळे, नंदुरबार सह पाच जिल्हा परिषद आणि ३३ पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणं हा ओबीसींवर मोठा अन्याय असल्याचेही मुंडे म्हणाल्या.

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय मार्गी लागल्याशिवाय आम्ही निवडणुका होऊ देणार नाही असं वक्तव्य राज्यातील मंत्र्यांनी केलं होतं. मग आता हा निवडणुका कार्यक्रम कसा जाहीर झाला, असाही प्रश्न मुंडे यांनी केला आहे. तसेच याविरुद्ध न्यायालयात धाव घेणार असल्याची माहितीही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

सध्या राज्य शासनाने न्याय देण्याची भूमिका घेण्याची गरज आहे. राजकीय आरक्षणाचा विषय मार्गी लागेपर्यंत या निवडणुका न घेण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली पाहिजे. तसेच आमच्याबरोबर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर आमच्याबरोबर न्यायालयात यावे असं आवाहनही पंकजा मुंडे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT