pankaja munde pankaja munde
महाराष्ट्र बातम्या

पातळी सोडून पंतप्रधानवर टीका नको, पंकजा मुंडेंचा सल्ला कोणाला?

संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : पंतप्रधान (pm narendra modi) हे देशाचे नेते असतात सर्वांनी त्यांचा सन्मान केला पाहिजे त्यांच्यावर टीका टिकम टिपणी करणे व पातळी सोडून बोलणे चुकीचे आहे असे भारतीय जनता पार्टीच्या (BJP) नेत्या तथा माजी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी व्यक्त केले. शहरात दौऱ्यावर आलेल्या मुंडे यांनी विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे व शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या निवास्थानी सदिच्छा भेट दिली. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

नाव न घेता पटोलेंवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मुंडे यांनी नाव न घेता पटोले याच्यावर टीका केली. पंतप्रधान हे एका पक्षाचे नसतात. ते देशाच्या संविधानातील महत्वाचे पद असून ते संपूर्ण देशाचे असतात. त्यांच्याबद्दल कोणीही बोलताना पातळी सोडून बोलू नये. ओबीसी राजकीय आरक्षण संदर्भात बोलताना ८ फेब्रुवारीला कोर्टात निर्णय लागेपर्यंत त्याची मी प्रतीक्षा करणार आहे. मात्र पुढील निवडणुका या ओबीसी आरक्षणशिवाय होत असून याचे दुःख आहे. याप्रश्नी सरकार आपलं मत कसे मांडते याच्यावर आम्ही लक्ष ठेवून असून सरकारने प्रभावीपणे भूमिका मांडावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. भाजपमध्ये आपण नाराज आहात का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला नंतर स्मितहास्य करून मुंडे यांनी त्यावर उत्तर देणे टाळले.

आमदार दराडे व माजी उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांचे कौटुंबिक संबंध असल्याने आज पंकजा मुंडे यांनी दराडे बंधूच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. सामजिक विषयांवर चर्चा झाली. दराडे कुटुंबातर्फे येवल्याची पैठणी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार दराडे बंधूसह जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती सुरेखा दराडे, मीना दराडे, डॉ. कविता दराडे, सिद्धांत दराडे यांनी त्यांचा सत्कार केला. भाजपाचे नेते नगरसेवक प्रमोद सस्कर, ओबीसी आघाडीचे अध्यक्ष सुनील काटवे यांनी देखील मुंडे यांचा सत्कार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT