dhananjay munde and pankaja munde dhananjay munde and pankaja munde
महाराष्ट्र बातम्या

'फक्त पालकमंत्रीपद असून भागत नाही', बीडमध्ये सगळ्या जागांवर भाजप

ओमकार वाबळे

राज्यात आज 93 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात भाजपला काही ठिकाणी जागा मिळा्ल्या आहेत. बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंडे असा संघर्ष नेहमी पाहायला मिळतो. यंदा धनंजय मुंडे यांना भाजपने धक्का दिला आहे. बीडमधील पाचही नगरपंचायतींमध्ये पंकजा मुंडे समर्थकांनी बाजी मारली आहे. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला आहे. फक्त पालकमंत्रीपद असून चालत नाही, असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे. (Pankaja Munde taunts Dhanajay munde over nagarpanchayat election 2022)

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

राष्ट्रवादीला सत्ता असून देखील यश मिळवणं कठीण झालंय. भाजपला लोकांनी चांगली साथ दिली. बीडमध्ये सर्व नगरपंचायतींमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे विजयी उमेदवारांचे मी अभिनंदन करते, असं मुंडे म्हणाल्या.

बीड जिल्ह्याच्या गेल्या अडीच वर्षातील लोकांचा रोष आणि अपेक्षांचा हा निकाल आहे. बीड जिल्ह्यामधील एकही आमदार दुसऱ्या मतदारसंघाचा विचार करत नाही. त्यामुळे सर्वांगीण विकास कोणी करत नाही, असं त्यांनी म्हटलं.

भाजप विरोधात नाही..जनतेचा कौल आम्हालाच!

भारतीय जनता पार्टी राज्यात विरोधात नाही. लोकांनी भाजपला मतदान केलं होतं. मात्र, राजकीय समिकरणांमुळे महाविकास आघाडी स्थापन झाली. मात्र, भाजपा जनतेच्या मनातील पक्ष आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. ओबीसी आरक्षणामुळे निवडणुकांवर परिणाम झाला. आम्ही ठरवलेल्या जागा ओबीसी समाजाला दिल्या. मात्र राष्ट्रवादीने ऐनवेळी जागा बदलल्या. त्याचा त्यांना फटका बसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT