Parambir-Singh sakal media
महाराष्ट्र बातम्या

परमबीर सिंह यांचा ठावठिकाणा सापडेना; राज्य सरकारची हायकोर्टात कबुली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir singh) यांचा ठावठिकाणा सापडत नसल्याची कबुली आज राज्य सरकारने (mva Government) मुंबई उच्च न्यायालयात (mumbai high court) दिली. तसेच त्यांचा पत्ता लागत नसल्यामुळे यापुढे ॲट्रॉसिटी प्रकरणात (atrocity case) त्यांना दिलासा देणार नाही, असेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
सिंह यांच्याविरोधात ठाणे पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी आणि भ्रष्टाचारप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल (police FIR) करण्यात आला आहे.

या प्रकरणात अटकेपासून आणि कठोर कारवाईपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी करणारी याचिका सिंह यांनी चार महिन्यांपूर्वी न्यायालयात दाखल केली आहे. राज्य सरकारने आतापर्यंत प्रत्येक सुनावणीमध्ये सिंह यांच्यावर कठोर कारवाई करणार नाही, अशी भूमिका मांडली आहे; मात्र आता त्यांचा पत्ता कुठे आहे माहिती नाही. अशा परिस्थितीत त्यांना संरक्षण देता येणार नाही, असे विशेष सरकारी वकील दरायस खंबाटा यांनी न्या. नितीन जामदार आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाला आज सांगितले. याला परमबीर सिंह यांच्या वतीने ॲड. महेश जेठमलानी यांनी विरोध केला. न्यायालयाने याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी निश्चित केली आहे.

ठाण्यातील एका भ्रष्टाचार प्रकरणात परमबीर सिंह यांनी काही जणांविरुद्ध तक्रार दाखल करू नये म्हणून दबाव आणला आणि जातिवाचक शब्द वापरले, अशी तक्रार भीमराव घाडगे यांनी केली आहे. घाडगे सध्या अकोलामध्ये कर्तव्यावर आहेत; मात्र माजी गृहमंत्ती अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले म्हणून मला लक्ष्य केले जात आहे, असा आरोप सिंह यांनी केला आहे.

अद्याप फरारी घोषित नाही!

परमबीर सिंह यांना अद्याप पोलिसांनी फरारी घोषित केलेले नाही. पोलिसांनी आतापर्यंत दोनदा त्यांना समन्स बजावले होते आणि दोन्ही वेळेस त्यांनी उत्तर दाखल केले आहे, अशी बाजू सिंह यांच्या वतीने ॲड. महेश जेठमलानी यांनी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह 'उत्तर'मध्ये मुसळधार पाऊस; बीड, साताऱ्यात दोन शेतकऱ्यांचा वीज कोसळून मृत्यू

Karul Ghat Truck Accident : करूळ घाटात ट्रक दरीत कोसळला, बाप-लेकाचा मृत्यू; सह्याद्री जीवरक्षकांच्या मदतीने मृतदेह काढले बाहेर

Kannad Taluka News: कन्नड तालुक्याला तिसऱ्यांदा महिला बालकल्याण सभापतीपदाचा मान; मिनाक्षी किशोर पवार यांची वर्णी!

Maharashtra Weather Update : पुढील ५ दिवस धोक्याचे! राज्यातील 'या' जिल्ह्यांत गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा

Maharashtra Education: दिशाभूल करणाऱ्या शाळांना बसणार चाप; शालेय शिक्षण विभागाची नवी नियमावली, नेमके कसे आहेत बदल?

SCROLL FOR NEXT