आयटी पार्क sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापुरातील आयटी पार्कचा मार्ग मोकळा! ‘लॉजिस्टिक पार्क’ला जागा देण्याचा ठराव कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून रद्द, आता हस्तांतरणाची प्रतीक्षा, वाचा...

होटगी येथील जलसंपदा विभागाच्या जागेवर आयटी पार्क साकारले जाणार आहे. आयटी पार्कसाठी ही जागा जलसंपदा विभागाकडून एमआयडीसीकडे विनामोबदला हस्तांतरित होणे आवश्‍यक आहे. साधारणत: २०२१-२२ मध्ये ही २० हेक्टर जागा लॉजिस्टिक पार्कला देण्याचा ठराव कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळात झाला होता. लॉजिस्टिक पार्कला जागा देण्याचा झालेला ठराव नियामक मंडळाच्या बैठकीत रद्द करण्यात आला आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : होटगी येथील जलसंपदा विभागाच्या जागेवर आयटी पार्क साकारले जाणार आहे. आयटी पार्कसाठी ही जागा जलसंपदा विभागाकडून एमआयडीसीकडे विनामोबदला हस्तांतरित होणे आवश्‍यक आहे. साधारणत: २०२१-२२ मध्ये ही २० हेक्टर जागा लॉजिस्टिक पार्कला देण्याचा ठराव कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळात झाला होता. लॉजिस्टिक पार्कला जागा देण्याचा झालेला ठराव नियामक मंडळाच्या बैठकीत रद्द करण्यात आला आहे. लॉजिस्टिक पार्कची जागा आता आयटी पार्कसाठी ‘एमआयडीसी’ला देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नियामक मंडळाच्या येत्या बैठकीत हा ठराव होण्याची शक्यता आहे.

साधारणत: दोन महिन्यांतून एकदा नियामक मंडळाची बैठक होते. पुढील बैठकीत जागा हस्तांतरणाचा ठराव व्हावा, यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. प्रयत्नशील आहेत. जलसंपदाकडून ही जागा एमआयडीसीला हस्तांतरित झाल्यानंतर या संदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून आयटी पार्कच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे.

सोलापूरची विमानसेवा सुरू झाल्यानंतर सोलापुरात आयटी पार्क असावे, अशी येथील युवकांची इच्छा आहे. त्या दृष्टीने महायुती सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून होटगी आयटी पार्ककडे पाहिले जात आहे. सोलापुरात आयटी पार्क झाल्यानंतर सोलापूर व परिसरातील युवकांना याच ठिकाणी रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. शिक्षणासाठी व नोकरीसाठी सोलापुरातून होणारे स्थलांतरण थांबले जाणार आहे. येथील आयटी पार्कला लागणाऱ्या विजेसाठी एनटीपीसीच्या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पासोबत करारही झाला आहे.

आकडे बोलतात...

  • होटगी तलावाच्या जागेचा हिशेब (गट क्र. ५७६)

  • एकूण जागा : २८४.७४ हेक्टर

  • बुडीत क्षेत्र : २४० हेक्टर

  • ‘एमएसईबी’ला दिलेली जागा : २.८ हेक्टर

  • प्राथमिक आरोग्य केंद्रास दिलेली जागा : ०.६९ हेक्टर

  • पर्यटन विकासासाठी : ३.८३ हेक्टर

  • सोलार प्रकल्पासाठी : १४.६५ हेक्टर

  • प्रस्तावित आयटी पार्कसाठी : २० हेक्टर

आता आयटी पार्कच्या प्रक्रियेला येईल गती

सोलापूरच्या विकासासाठी आवश्‍यक असलेल्या प्रकल्पांमध्ये पंढरपूर कॉरिडॉर आणि होटगी येथील आयटी पार्क हे विषय प्रथम प्राधान्याचे आहेत. हे प्रकल्प वेळेत मार्गी लावण्यासाठी आम्ही कालबद्ध नियोजन केले आहे. कृष्णा खोरेच्या नियामक मंडळाच्या येत्या बैठकीत ही जागा एमआयडीसीकडे हस्तांतरित होईल. त्यानंतर आयटी पार्कच्या पुढील प्रक्रियेला अधिक गती येईल.

- कार्तिकेयन एस., जिल्हाधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Verdict Pune: ''आता फासावर चढा.. वय नव्हे, क्रूरता महत्त्वाची'' निकालपत्र वाचून दाखवताना कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Venezuela Earthquake: नेमारची फुटबॉल मैदानापलीकडची माणुसकी! भूकंपाच्या धक्क्यातून सावरणाऱ्या देशाला मदतीचा हात; किती दिली देणगी?

नसरापूर अत्याचार प्रकरणी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा, कोर्टाचा मोठा निर्णय; ६० दिवसात निकाल अन् सुनावणी

Latest Marathi News Live Update : जन्मोजन्मी हीच पत्नी लाभू दे... कुडाळमध्ये 17 वर्षांपासून पुरुषांकडून अनोखी वटपौर्णिमा

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! 2 प्रसिद्ध अभिनेत्रीचाही सहभाग; गिरगावमध्ये पोलिसांची धडक कारवाई

SCROLL FOR NEXT