uddhav thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Mumbai BJP : "देशाच्या बँका बुडवणारे लोक मुंबई भाजपमध्ये..." ; ठाकरे गटाचा गंभीर आरोप

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात ईडीची विरोधकांवर मोठी कारवाई सुरू आहे. काल शिवसेना नेते सदानंद कदम यांना अटक करण्यात आली. त्यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रिफ यांच्या घरावर ईडीने छापे टाकले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. भाजप सरकार विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी ईडीचा वापर करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर आपलू भूमिका स्पष्ट केली. 

संजय राऊत म्हणाले, सदानंद कदम यांना अटक केली. हे आधीच मुलुंडच्या पोपटाला माहित होते. ईडीने सांगण्यापूर्वी किरीट सोमय्या यांना कसे माहित झाले. तसेच हसन मुश्रीफ यांची  FIR कॉपी आधी किरीट सोमय्या यांनी कशी मिळते, याबाबत कोर्टाने देखील चौकशीचे आदेश दिले आहेत. 

आम्ही अनेक वर्ष सांगत आहोच किरीट सोमय्या यांच्या विक्रांत घोटाळ्याची चौकशी करा, मात्र त्यांला क्लीनचिट मिळत आहे. या देशाच्या बँका बुडवणारे लोक मुंबई भाजपमध्ये काम करतात आणि आमच्यावर हल्ले करतात, असे संजय राऊत म्हणाले. 

कसबा निकालानंतर महाविकास आघाडी गतीने पुढे जात आहे. ही गती थांबवण्यासाठी कारवाई सुरू आहेत. ह्या सर्व कारवाई बोगस आहेत. अनिल देशमुख आणि माझ्या प्रकरणात कोर्टाने हे स्पष्ट सांगितलं आहे. जे विरोधात बोलतात त्यांच्या विरोधात ईडीचा गैरवापर सुरू आहे. मात्र आम्ही घुडगे टेकणार नाही. सत्तेचा कुणी अमरपट्टा घेऊन आलं नाही. २०२४ नंतर या लफंग्यांना जनता रस्त्यावर पकडून मारेल, असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT