pm narendra modi pune visit mva parties shiv sena congress and ncp to stage protest  sakal
महाराष्ट्र बातम्या

पुणे : मोदींच्या दौऱ्यादरम्यान शिवसेना, काँग्रेससह राष्ट्रवादी करणार आंदोलन

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांच्या आगामी पुणे दौऱ्यात शिवसेना (Shivsena) , राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस(Congress) चे कार्यकर्ते त्यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा विचारात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 6 मार्चला पुण्याच्या दौऱ्यावर येणार असून, राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी (MVA) तील हे तीन पक्ष त्यांचा विरोधात उभे राहाणार आहेत.

पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप आणि काँग्रेसचे रमेश बागवे यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. या स्थानिक नेत्यांनी सांगितले की, हा निषेध पंतप्रधानांनी संसदेत केलेल्या विधानाच्या विरोधात असेल, ज्यामध्ये त्यांनी कोरोना विषाणूच्या साथीच्या प्रसारासाठी महाराष्ट्र सरकारला जबाबदार धरले होते. जगताप म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मते मिळवण्यासाठी लोकसभेत भाष्य करताना महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रसार देशातील इतर राज्यांमध्ये झाल्याचे सांगितले होते. हा आपल्या राज्याचा अपमान होता. त्यामुळे त्यांच्या पुणे दौऱ्यात तिन्ही पक्ष 'मोदी गो बॅक' आंदोलन करणार आहेत.

कपडे घालून करणार आंदोलन

राष्ट्रवादीच्या नेत्याने सांगितले की, शहरातील सर्वच चौकात हे निदर्शने करण्यात येणार असून आंदोलक काळे कपडे परिधान करतील. 6 मार्च रोजी मेट्रो रेल्वे सेवेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी पुण्यात येऊ शकतात, परंतु त्यांच्या कार्यक्रमाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT