MLA shambhuraj desai Reaction after ajit pawar portfolio CM Shinde Fadnavis Govt political news  
महाराष्ट्र बातम्या

Oath Ceremony : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एकही मंत्रिपद नाही?, तटकरेंच्या निवासस्थानी खलबतं, बैठकीसाठी फडणवीस तातडीने दाखल

संतोष कानडे

Ajit Pawar News : देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन होत आहे. रविवारी सायंकाळी शपथविधी होत असून अनेकांची नावं मंत्रिपदासाठी पुढे येत आहेत. महाराष्ट्रातून प्रफुल्ल पटेल यांचं नाव शुक्रवारपासून पुढे येत होतं. परंतु आता त्यांना मंत्रिपद मिळणार नसल्याची शक्यता आहे. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे.

एनडीएमधील घटकपक्षांना भाजप सन्मानाने संधी देणार असल्याचं स्पष्ट असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला मात्र एकही मंत्रिपद मिळणार नसल्याचं दिसून येत आहे. प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपदासाठी फोन आलेली नाही, असं वृत्त 'साम'ने दिलेलं आहे.

दिल्लीमध्ये सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी खलबतं सुरु आहेत. दिल्लीत अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची बैठक सुरु असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तटकरेंच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठक सुरु झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतील बैठकीमध्ये प्रफुल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ हे नेते उपस्थित आहेत. अजित पवार गट वेटिंगवर असल्याने फडणवीसांनी तातडीने तटकरेंच्या निवासस्थानी दाखल होत चर्चा सुरु केली आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने चार अधिक एक अशा पाच जागांवर निवडून लढवली होती. परंतु केवळ एका जागेवर पक्षाचा विजय झाला. रायगडमधून सुनील तटकरे विजयी झाले आहेत. त्यामुळेच कदाचित भाजपकडून त्यांना मंत्रिपद नाकारलं जातंय. तरीही सायंकाळपर्यंत अनेक मोठे बदल होऊ शकतात, असं सांगितलं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Trains: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १७ जुलैपर्यंत पुणे-मुंबई २५ गाड्यांचे मार्ग बदलले, दौंड-मनमाड मार्गे गाड्या वळवल्या..

Maharashtra land Acquisition: भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्याचा मोठा निर्णय; १०३ विशेष भूसंपादन अधिकारी पदांची पुनर्रचना, प्रकल्पांना मिळणार वेग

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Kolhapur Monsoon Rainfall : धरण क्षेत्रांत 41 दिवसांत 36 वेळा अतिवृष्टी; सर्वाधिक पाटगाव क्षेत्रात, सर्फनालामध्ये 24 तासांत 347 मिमी.ची नोंद

उत्तम गुंतवणूक : एलेनबारी इंडस्ट्रियल गॅसेस (शुक्रवारचा बंद भाव : रु. २९४.२५)

SCROLL FOR NEXT