पोलिसांचा बंदोबस्त Sakal
महाराष्ट्र बातम्या

पोलिस पंढरपुरात बंदोबस्तासाठी अन्‌ बीड, अहिल्यानगर, जालना जिल्ह्यातील चोरटे सोलापुरात! बीबी दारफळ रोड व अक्कलकोट रोडवर पकडले ११ संशयित, मिरची पावडरसह सापडले ‘हे’ साहित्य

सोलापूर शहरासह जिल्ह्यातील २७ पोलिस ठाण्यातील बरेच अधिकारी, अंमलदार आषाढी वारीच्या बंदोबस्तासाठी पंढरपुरात आहेत. या संधीचा फायदा घेऊन दरोड्यासाठी सोलापुरात आलेल्या परजिल्ह्यातील दोन टोळ्यातील ११ जणांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी खबऱ्यांना कामाला लावले असून गस्तही वाढविली आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरासह जिल्ह्यातील २७ पोलिस ठाण्यातील बरेच अधिकारी, अंमलदार आषाढी वारीच्या बंदोबस्तासाठी पंढरपुरात आहेत. या संधीचा फायदा घेऊन दरोड्यासाठी सोलापुरात आलेल्या परजिल्ह्यातील दोन टोळ्यातील ११ जणांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी खबऱ्यांना कामाला लावले असून गस्तही वाढविली आहे.

बीड, अहिल्यानगर व जालना येथून सोलापुरात दरोड्यासाठी आलेल्या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या नेतृत्वातील पथकाने या पाच जणांना सोमनाथ नगर ते बीबी दारफळ रोडवरील साठे दरबार ढाब्याजवळ पकडले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली होती. शुक्रवारी (ता. २४) त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली. यात बीड जिल्ह्यातील सुरज भारत पवार (रा. राजुरी नवगण), नितीन अंकुश गायकवाड (रा. शिक्षक कॉलनी, बीड) यांच्यासह सचिन गणपत पिंगळे (रा. निमगाव शिर्डी, अहिल्यानगर), भागवत नामदेव जाधव (रा. चिंचोळी, घनसांगवी, जालना) आणि सोलापुरातील लिमयेवाडीचा निखील कुमार गायकवाड यांचा समावेश आहे.

दुसरीकडे सोलापूर-अक्कलकोट रोडवरील जिओ पेट्रोल पंपाजवळील ब्रिजखाली थांबलेल्या सहा जणांना अक्कलकोट उत्तर पोलिसांनी पकडले. यात सचिन बबन माशाळकर, राजू काळू पवार, सचिन भीमराव माशाळकर, बाळू नवनाथ माशाळकर, विशाल महादेव काळोखे व विकास रामनाथ खवले (सर्वजण रा. पाथर्डी, अहिल्यानगर) यांचा समावेश आहे. न्यायालयाने यांना एक दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. या संशयितांविरुद्ध देखील पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत. सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर तपास करीत आहेत.

मिरची पावडरसह आढळले दरोड्याचे साहित्य

सध्या आषाढी वारीतील गर्दी आणि आषाढीच्या निमित्ताने गावागावातील लोक पंढरपूरला गेल्याने त्यांनी रात्री दरोडा आणि दिवसा पंढरपुरातील वारकऱ्यांच्या साहित्याची चोरी, असा त्यांचा प्लॅन होता. या संशयितांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडे हातोडी, कोयता, लोखंडी कटर, स्क्रू ड्रायव्हर, पक्कड, पान्हा, रिंगपाना, एक्साब्लेड, मिरची पावडर, लोखंडी पाते आढळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

Student Protest Support: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांचा जंतर-मंतरवर पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

Yavatmal Police Operation Prasthan: विद्यार्थी सुरक्षेसाठी यवतमाळ पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रस्थान’; १,२०० मुख्याध्यापकांना मार्गदर्शन, शाळांत सीसीटीव्ही, तक्रार पेटी व नशामुक्त परिसराची सक्ती

SCROLL FOR NEXT