nia to probe umesh kolhe murder case arrest all seven accused today amravati
nia to probe umesh kolhe murder case arrest all seven accused today amravati sakal
महाराष्ट्र

अमरावती हत्याकांड! पोलिस आयुक्तांचा खुलासा; कोल्हेंच्या हत्येचं कारण स्पष्ट

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - अमरावती हत्याकांडात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. अमरावतीमधील केमिस्ट उमेश कोल्हे खून प्रकरण हे पैगंबर मुहम्मद वादाशी संबंधित असल्याचा खुलासा पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी केला आहे. स्थानिक भाजप युनिटच्या सदस्यांनी पोलिसांवर हत्येमागील खरी कारणे लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर हत्येच्या सुमारे 10 दिवसांनंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे. (police disclose facts in umesh kolhe murder case)

भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही चॅनलवर प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त टिप्पणी केली होती, त्यानंतर देशातील आणि जगभरातील मुस्लिमांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. अमरावतीमध्ये हत्या झालेल्या केमिस्ट उमेश कोल्हेंनी नुपूर शर्माला पाठिंबा दिला होता. त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आल्याचं आरती सिंह यांनी सांगितलं. ही बाब आधीच माहित होती, पण या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेत खुलासा केला नाही, असही त्यांनी सांगितलं. मारेकऱ्यांकडे प्रत्येकी 10 हजार रुपये आणि एक दुचाकी मिळाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

नवनीत राणाच्या आरोपांवर पोलिसांचे स्पष्टीकरण

खासदार नवनीत राणा यांनी आरोप केला होता की, हे प्रकरण एनआयएकडे सोपविण्यापर्यंत पोलिस सुस्तपणे वागत राहिले. मात्र पोलीस आयुक्तांनी हा आरोप फेटाळून लावला. तसेच खासदार नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांच्याविरोधात पोलिसांनी काही दिवसांपूर्वी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे त्या पोलिसांवर खोटे आरोप करत असल्याचं आरती सिंह यांनी म्हटलं.

दरम्यान 54 वर्षीय उमेश कोल्हे हे घरी परतत असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी चाकूने वार केले. राजस्थानच्या उदयपूरमध्ये आठवडाभरापूर्वी अशाच हत्याकांडाची ही गोष्ट आहे. या प्रकरणी आतापर्यंत या घटनेचा कथित सूत्रधार इरफान शेख रहीमसह सात आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एकाचा शोध सुरू आहे. इरफान शेखने 5 मारेकऱ्यांना पैसे आणि बाईक दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT