Women Safety Maharashtra Police Women Safety, Maharashtra Police, Damini Pathak
महाराष्ट्र बातम्या

Women Safety: शाळा-महाविद्यालयात आता पोलिस काका, पोलिस दीदी! मुली-महिलांनो, 'हा' क्रमांक आजच मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा

Solapur Crime News: शहरात प्रभावीपणे पोलिस काका व पोलिस दीदी उपक्रम राबविण्याचे नियोजन पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी केले आहे. त्यानुसार शहरातील प्रत्येक शाळा-महाविद्यालयातील मुलींच्या रक्षणासाठी त्या त्या हद्दीतील पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांकडे पालकत्व देण्यात आले आहे.

तात्या लांडगे

Solapur Latest News Police Commissioner M Rajkumar On Women Safety

सोलापूर : शहरात प्रभावीपणे पोलिस काका व पोलिस दीदी उपक्रम राबविण्याचे नियोजन पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी केले आहे. त्यानुसार शहरातील प्रत्येक शाळा-महाविद्यालयातील मुलींच्या रक्षणासाठी त्या त्या हद्दीतील पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांकडे पालकत्व देण्यात आले आहे.

बदलापूर दुर्घटनेनंतर शालेय शिक्षण विभागाने प्रत्येक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, त्यांच्याकडील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे (शिपाई, बागकाम करणारा, सफाई कामगार असे) पोलिस व्हेरिफिकेशन करून घ्यावे, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार अद्याप सोलापूर शहर- जिल्ह्यात अपेक्षित काम झालेले नाही. दुसरीकडे पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथक सक्रिय झाले असून पोलिस काका, पोलिस दीदी हा उपक्रम देखील प्रभावीपणे राबविला जात आहे. शाळांमधील अल्पवयीन मुली, महाविद्यालयातील युवतींना कोणीतरी छेड काढली किंवा कोणी त्रास देत असल्यास त्यावेळी नेमकी मदत कोणाकडे मागायची, यासंबंधीचे मार्गदर्शन केले जात आहे.

शाळांमध्ये दिले पोलिस कर्मचाऱ्यांचे मोबाइल क्रमांक

शहरातील प्रत्येक शाळा, महाविद्यालयांना भेटी देऊन दामिनी पथकातील महिला पोलिस कर्मचाऱ्यांचे क्रमांक दिले आहेत. तेथील फलकावर दर्शनी भागात क्रमांक लावण्याच्या सूचनाही शाळांना केल्या आहेत. दुसरीकडे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काका, पोलिस दीदी या उपक्रमाअंतर्गत स्थानिक पोलिस ठाण्याच्या काही कर्मचाऱ्यांवर त्या त्या परिसरातील शाळा- महाविद्यालयांची जबाबदारी दिली आहे. त्यांचेही क्रमांक शाळांमध्ये देण्यात आले आहेत.

- धनाजी शिंगाडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महिला सुरक्षा कक्ष, सोलापूर शहर

महिला- मुलींकडे असावा ‘हा’ क्रमांक

शहरातील प्रत्येक शाळा- महाविद्यालयात दामिनी पथकातील महिला कर्मचारी, पोलिस काका, पोलिस दीदी यांचे क्रमांक देण्यात आले आहेत. याशिवाय कोणत्याही व्यक्तीला विशेषत: मुलीला, महिलेला काही अडचण आली आणि त्यांना तातडीने पोलिसांची मदत हवी असल्यास त्यांनी ‘११२’ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. १० ते १५ मिनिटात पोलिसांची मदत त्या व्यक्तीला मिळू शकते, अशी ग्वाही शहर पोलिसांनी दिली आहे.

रोडरोमियोंवर आता ‘दामिनी’चे लक्ष

शाळा- महाविद्यालय भरताना किंवा सुटताना बाहेर अथवा रोडवर थांबलेल्या रोडरोमियोंवर आता शहर पोलिसांच्या दामिनी पथकाकडून कारवाई केली जाणार आहे. काहीवेळा समज देऊनही वर्तनात सुधारणा न झालेल्यांवर महाराष्ट्र पोलिस कायद्याप्रमाणे कारवाई केली जाणार असून त्या मुलांच्या पालकांनाही समज दिली जाणार आहे. शहरात सध्या दामिनीची दोन पथके असून त्याअंतर्गत १२ महिला पोलिस कार्यरत आहेत. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, बगीचे, खासगी कोचिंग क्लासेस अशा प्रमुख ठिकाणी त्या पथकाची गस्त असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात पावसाचा हाहाकार, मुंबईत ८० किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता, नागरिकांनी सतर्क राहण्याचं मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकची एक लेन सुरू, दुसरी बंद; वाहतूक पर्यायी मार्गाने, प्रवास करण्याआधी चेक करा

Latest Marathi News Live Update : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी; उर्से टोलनाक्याचा राडारोडा रस्त्यावर

Koyna Dam Water : पाऊस लांबताच समजले कोयनेच्या पाण्याचे महत्त्व! वीज निर्मिती बंद पडताच वाशिष्ठी कोरडी; पिण्याच्या पाण्यासह उद्योगांवर परिणाम

Pune Rain Alert: वडीवळे धरण ९० टक्के भरलं; मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू; इंद्रायणी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT