police will go to devendra Fadnavis house for interrogation ajit pawar on inquiry notice to Fadnavis  e sakal
महाराष्ट्र बातम्या

चौकशीसाठी पोलिसच जाणार फडणवीसांच्या घरी; अजित पवार म्हणतात…

सकाळ डिजिटल टीम

फोन टॅपिंग प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली असून पोलिस आज त्यांचा जबाब नोंदवणार आहेत, याआधी त्यांना बीकेसी सायबर पोलिस ठाण्यात बोलवण्यात आले होते, पण काही वेळातच आता पोलिसांनी फडणवीस यांना तुम्ही येऊ नका असे सांगतीले आणि आता पोलिसत फडणवीस यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांचा जबाब घेणार आहेत. पोलिसांनी नोटिस पाठवल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनीच दिली होती.

पोलिस बदली घोटाळ्यावर बोट ठेवत माजी मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविद्यालय आघाडी वर गंभीर आरोप केले. आता याच आरोपावर महाविकास आघाडी कडून प्रतिप्रश्न करत "ही माहिती कुठून आली आणि याचे सोर्सेस काय?" असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. याच संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी बीकेसी सायबर पोलिस ठाणे कडून नोटीस धाडण्यात आली आणि आज सकाळी साधारण 11 वाजता बीकेसी सायबर पोलीस ठाण्याकडून पोलिस अधिकारी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच सागर बांगला येथे पोहोचणार आहेत.

दरम्यान या सर्व नोटीस प्रकरणाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही पक्षांनी जबाबदारीने वागण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, "देवेंद्र फडणवीसांना कशामुळे नोटिस दिली? यापूर्वी देशात, राज्यात एकमेकांना नोटिसा देणे, यंत्रणांचा वापर करणे, असे प्रकार कधी झाले नाहीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर देखील मी हे बोलून दाखवलं. प्रत्येकानं आपापलं काम करावं". यावेळी अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा दाखला दिला. पवाप म्हणले की, “यशवंतराव चव्हाणांकडून जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्तीने कसं वागलं पाहिजे, हे शिकावं" असे सांगितले.

लोकांना रस नाही

पुढे बोलताना त्यांनी राजकीय नेते एकमेकांवर करत असलेले आरोप-प्रत्यारोप यामध्ये लोकांना कसलाही रस नसतो असे सांगितले, पवार म्हणाले की, 'एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना ऐकणं लोकांना अजिबात आवडत नाही, सर्वांनी मिळून हे बंद केलं पाहिजे आणि विकासाला महत्व दिले पाहिजे'. पुण्यात आज अजित पवारांचे ३१ ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. सूस भागात एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT