prakash ambedkar ajit pawar sakal media
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: "राजकीय भूकंप होणारच होता, पण...मी माझ्या विधानावर ठाम"

राज्याच्या राजकारणात येत्या 15 दिवसांत २ मोठे बॉम्बस्फोट होतील असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात येत्या 15 दिवसांत २ मोठे बॉम्बस्फोट होतील असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. यानंतर अजित पवार भाजपात प्रवेश करणार या चर्चांवर त्यांनी हे विधान केलं होतं. मात्र अजित पवारांनी मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचा खुलासा केला आणि सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. त्यानंतर पुन्हा पत्रकारांनी प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारला त्यावर मी अजूनही माझ्या विधानावर ठाम असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मोठा भूकंप ज्यावेळी होतो तेव्हा त्याचे छोटे छोटे संकेत दिसायला लागतात. एक भूकंप होता होता थांबला असं त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. मी सध्या यावर भाष्य करणार नाही. माझे जे विधान आहे राज्यात २ भूकंप होतील त्यावर मी कायम आहे. सगळेच सांगितले तर उत्सुकता जाते. त्यामुळे मी सांगत नाही असं त्यांनी सांगितलं आहे.

कुणालाही अपात्र ठरवण्याचा अधिकार कोर्टाला नाही

सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तरी कोर्टाला कुणाला अपात्र करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे निकालातून अपात्र होईल असं वाटत नाही. अपात्रतेची जी कार्यवाही होती. विधानसभा उपाध्यक्षांच्या कारवाईवर स्थगिती होती ती उठवली जाईल असं वाटते असंही ते पुढे म्हणालेत.

तर राज्यपाल, विधिमंडळ यात कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही. राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयावर कोर्ट भाष्य करणार नाही. राज्यपालांचा निर्णय बदलला जाईल असं वाटत नाही कारण घटना होऊन गेली आहे. उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीआधीच राजीनामा दिला होता. राज्यपालांचे आदेश मागे घेण्याबाबत घटनात्मक बंधन आहेत. विधानसभा उपाध्यक्षांच्या कारवाईला स्थगिती दिली होती ते उठवला जाईल असा अंदाज प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT