Hasan Mushrif  esakal
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे जनतेचा अपमान; मुश्रीफांचे राणेंवर टीकास्त्र

बाळकृष्ण मधाळे

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत (chief minister uddhav thackeray) आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे (Minister Narayan Rane) यांच्या अटकेची मागणी होत असतानाच, आता महाविकास आघाडीतील नेतेही आता राणेंविरोधात मैदानात उतरु लागले आहेत. कालच्या राणेंच्या वक्तव्याचा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व दादा भुसेंनी (Dada Bhuse) जाहीररित्या नाराजी व्यक्त करत राणेंच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

राणेंनी केलेलं वक्तव्य म्हणजे हा केवळ मुख्यमंत्र्यांचाच अपमान नाही, तर तो जनतेचा देखील अपमान आहे.

मुश्रीफ म्हणाले, राणेंनी केलेलं वक्तव्य म्हणजे हा केवळ मुख्यमंत्र्यांचाच अपमान नाही, तर तो जनतेचा देखील अपमान आहे. भाजपाने राणेंना पुढे करुन अशाप्रकारे बडबड करायला लावणं हे योग्य नाही. महाविकास आघाडीची सत्ता अस्थिर होत नाही, म्हणून ही भाजपकडून मोठी चाल खेळली जात आहे, हा त्यांचा एकप्रकारचा स्टंटच आहे. अशा प्रकारचं बेताल वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींना पुढं करायचं आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करायची, हा असला अपमान जनता कदापि सहन करणार नाही, असा इशाराही मुश्रीफांनी राणेंना दिला.

ही बडबड अशीच सुरु राहिली, तर महाविकास आघाडीतील नेतेही आक्रमक भूमिका घेऊन राणेंचा समाचार घेतील. त्यामुळे राणेंनी मुख्यमंत्र्यांसह जनतेची माफी मागावी, तीही विना विलंब, असा सल्लाही त्यांनी भाजपसह राणेंना दिला. दरम्यान, दादा भुसेंनी देखील राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यावर टीका केलीय. ते म्हणाले, राणेंचं वय झालंय, त्यांची मानसिक स्थिती तपासण्याची गरज आहे. राणेंनी केलेलं वक्तव्य म्हणजे, १०५ हुतात्म्यांचा अपमान असून हे लोकशाहीला देखील मारक असल्याची टीका त्यांनी केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT