Prithviraj Chavan esakal
महाराष्ट्र बातम्या

'महाविकास आघाडीचा निर्णय न झाल्यास काँग्रेस स्‍वबळावर लढणार'

गिरीश चव्हाण

वडूज येथे एका कार्यक्रमादरम्‍यान उपमुख्‍यमंत्र्यांनी पृथ्‍वीराज चव्‍हाण यांचे नाव न घेता त्‍यांच्‍यावर टीका केली होती.

सातारा : मुख्‍यमंत्री असताना पृथ्‍वीराजबाबांनी धमक दाखविल्‍यानेच सातारा येथील मेडिकल कॉलेजला (Satara Medical College) मान्‍यता मिळाली. बारामती येथील मेडिकल कॉलेजच्‍या प्रस्‍तावावरदेखील त्‍यांचीच सही असून बाबांच्‍यात धमक होती, त्‍यामुळेच दुष्‍काळी भागातील पाण्‍याचा प्रश्‍‍न निकाली निघाल्‍याचे सांगत काँग्रेसचे जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. सुरेश जाधव (Dr. Suresh Jadhav) यांनी पत्रकार परिषदेत उपमुख्‍यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी केलेल्‍या टीकेला उत्तर दिले.

वडूज येथे काल झालेल्‍या कार्यक्रमादरम्‍यान उपमुख्‍यमंत्र्यांनी पृथ्‍वीराज चव्‍हाण (Prithviraj Chavan) यांचे नाव न घेता त्‍यांच्‍यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना श्री. जाधव म्‍हणाले, ‘‘मुख्‍यमंत्री असताना पृथ्‍वीराज चव्‍हाण यांनी सातारा मेडिकल कॉलेज मंजूर केल्‍यानंतर त्‍यासाठीची जागा देण्‍यास कोणत्‍या खात्‍याने टाळाटाळ केली आणि त्‍यावेळी त्‍या खात्‍याचे मंत्री कोण होते, याची माहिती जनतेला आहे. दुष्‍काळी भागात आलेले पाणी ही बाबांचीच धमक आहे.’’

जिल्‍हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत, कऱ्हाडमधील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, तालुक्‍यातील प्रशासकीय इमारती आदी बाबांमुळेच उभ्‍या राहिल्‍याचे सांगत श्री. जाधव यांनी अजित पवारांच्‍या टीकेचा समाचार घेतला. याचदरम्‍यान महाविकास आघाडीचा निर्णय झाल्‍यास ठिक नाही तर काँग्रेस साताऱ्यासह सर्वच पालिकांच्‍या निवडणुका स्‍वबळावर लढण्‍यास तयार असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

काँग्रेसला जिल्‍हा बँकेत हव्‍यात चार जागा

जिल्‍हा बँकेच्‍या निवडणुकीबाबत विचारले असता जाधव म्‍हणाले, ‘‘आम्‍ही चार जागांची मागणी केली असून त्‍याबाबत पृथ्‍वीराजबाबा बोलणी करत आहेत. मागितलेल्‍या चार जागांसाठीचे ठराव आम्‍ही केले असून त्‍यानुसार त्‍या मिळतील, अशी आम्‍हाला आशा आहे. याच निवडणुकीच्‍या अनुषंगाने सर्वपक्षीय विरोधी पॅनेलबाबत पृथ्‍वीराजबाबा आणि शंभूराज देसाई यांच्‍यात चर्चा झाली आहे. त्‍यात येण्‍यासाठी आमदार जयकुमार गोरे इच्‍छुक होते. त्‍यांनी तसा प्रस्‍ताव बाबांकडे दिला होता. मात्र, बाबांनी हा प्रस्ताव नाकारला आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate: मोठी बातमी! पेट्रोल पंपांवरून इंधन खरेदीवर ९० दिवसांची बंदी; केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, पण कुणासाठी?

LPG Update: LPG गॅस संपणार का? 3 दिवसांत तब्बल 1.40 कोटी गॅस बुकिंग! तुटवड्याच्या चर्चांदरम्यान सरकारचं मोठं स्पष्टीकरण

Mahimangad Fort : शिवरायांच्या काळातील ऐतिहासिक वारसा जपणारा 'महिमानगड' आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणार; 'राज्य संरक्षित स्मारक' दर्जा मिळाल्यावर काय बदलणार?

Latest Marathi News Live Update : गर्भवती असल्याचा दावा करणाऱ्या आरोपीच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी

Latur Farmer: अधिकारी फोटो काढून गेले अन्... मदतीचा बैलही निघाला आजारी; लातूरच्या शेतकऱ्याच्या दु:खाला अंतच नाही!

SCROLL FOR NEXT