Prafull Patel, ajit pawar and chhagan bhujbal sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar In Delhi: अजित पवार अर्थ खात्यासाठी आग्रही? प्रफुल पटेल स्पष्टच बोलले

Sandip Kapde

Ajit Pawar In Delhi: राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर अजित पवार महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप सरकारमध्ये सहभागी होऊन दहा दिवस उलटले आहेत. मात्र नवीन मंत्र्यांना खाते वाटपाचे काम प्रलंबित आहे. अजित पवार यांनी २ जुलै रोजी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, मात्र अद्याप खात्यांचे वाटप झालेले नाही.

मंत्रिमंडळ विस्तार आणि पोर्टफोलिओ वाटपाबाबत प्रदीर्घ बैठकांचा दौरा सुरू आहे. दरम्यान, अजित पवार बुधवारी (१२ जुलै) दिल्लीला गेले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक घेणार आहेत. अजित पवार यांना अर्थमंत्रालय हवे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, सरकारमध्ये सामील झाल्यापासून आमची आणि दिल्लीतीन नेत्यांची भेट नव्हती त्यामुळे औपचारीक भेट म्हणून आम्ही दिल्लीला आलो आहोत.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, आमच्यात कुठलाही वाद नाही. काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. त्यानंतर अजित पवार, माझी आणि सुनिल तटकरे यांची बैठक झाली. आमच्या गोष्टी क्लिअर झाल्या आहेत. खातेवाटपावर आज कोणतीही चर्चा झाली नाही.

आधीची खाती ही भाजप आणि शिवसेनेकडे आहेत. कुठलं खातं काढून आम्हाला द्यायचं नंतर त्या मंत्र्यांना कुठलं खाते द्यायचं याबाबत चर्चा सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू आहे. मागील दोन दिवसांपासून यावर चर्चा सुरू आहे, असे पटेल म्हणाले.

अर्थखात्यावरुन कोणताही वाद नाही. उद्या किंवा परवा खातेवाटप झालेले दिसेल, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘एटीएम’मधून पैसे काढायला गेल्यावर तुमचे कार्ड दुसऱ्याच्या हाती देऊ नका, अन्यथा...! उत्तर प्रदेशातील 2 चोरट्यांना फौजदार चावडी पोलिसांनी पकडले

IND vs PAK: भारताने विजयानंतर पाकिस्तानी खेळाडूंसोबत हात मिळवण्यास का दिला नकार? कर्णधार सूर्यकुमारने स्पष्ट शब्दात सांगितलं

IND vs PAK: 'पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांसोबत आम्ही उभे...' कर्णधार सूर्यकुमारची पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर मोठी प्रतिक्रिया

IND vs PAK, Asia Cup: भारतच ठरला 'बॉस', पाकिस्तानच्या ठेचल्या नांग्या; कर्णधार सूर्यकुमारचं वाढदिवशी भारतीयांना स्पेशल गिफ्ट

IND vs PAK, Asia Cup: अरर! पाकिस्तानच्या राष्ट्रगीतापूर्वी अचानक मैदानात वाजलं 'जलेबी बेबी'; Video तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT