Maratha Reservation sakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबद्दल प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान! म्हणाले, सिद्ध करा अन्...

Manoj Jarange Patil: आता उघडे झालेले दरवाजे बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Latest Jalna News: कुणबी पूर्वीपासूनच ओबीसीमध्ये आहेत. त्यामुळे कागदपत्रे देऊन, कुणबी सिद्ध करून आरक्षण घेण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील यांच्या सगेसोयरेच्या मागणीला आपण पूर्वीपासूनच सहमत नाही. कुणबी सिद्ध करा अन् आरक्षण घ्या, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

बुधवारी (ता. सात) जालना शहरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अॅड. आंबेडकर पुढे म्हणाले, आजचा दिवस ओबीसी समाजासाठी सोनेरी दिवस आहे. सात ऑगस्टरोजी ओबीसी आरक्षणाची घोषणा झाली होती. या आरक्षणामुळे ओबीसी समाजाच्या जीवनामध्ये सामाजिक, आर्थिक आणि शासकीय बदल झाला. आरक्षणामुळे ओबीसी समाजासाठी दरवाजे उघडे झाले.

मात्र, आता उघडे झालेले दरवाजे बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे ओबीसी बचाव यात्रा सुरू केली आहे. मनोज जरांगे यांच्यासोबत जी गर्दी आहे, ती गरीब मराठ्यांची आहे.

परंतु, त्यांच्या सगेसोयरेच्या मागणीला आपण सहमत नाही. कारण कागदपत्रे सादर करून कुणबी सिद्ध केल्यास संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आरक्षण मिळू शकते. मात्र, ओबीसींच्या आरक्षणामध्ये मराठ्यांचा कायदेशीररीत्या समावेश होऊ शकत नाही. त्यामुळे न्यायालयाने ते नाकारले आहे, असेही आंबेडकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand School Shooting : थायलंड हादरले ! आठवीच्या विद्यार्थ्याचा शाळेत अंदाधुंद गोळीबार; शिक्षकासह दोघांचा मृत्यू, १० विद्यार्थी गंभीर जखमी

Cricketer Retirement: चक्क २५ व्या वर्षीच क्रिकेटमधून निवृत्ती! युवा वेगवान गोलंदाजाचा धक्कादायक निर्णय

Jalgaon Flyover Proposal : जळगाव महामार्गावर होणार 3 नवीन उड्डाणपूल! खासदार स्मिता वाघ यांच्या प्रस्तावाला गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद, 'त्या' पुलाचीही घेतली गंभीर दखल

Marathi News Live Updates : लोकसभेचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब

Hardik Panyda Trade: २५ कोटीसह कर्णधारपदही मिळणार! हार्दिक पांड्यासाठी नवी फ्रँचायझी मैदानात; Mumbai Indians ला दिलीय अशी ऑफर, जी नाकारता येणार नाही...

SCROLL FOR NEXT