Prakash-Ambedkar
Prakash-Ambedkar esakal
महाराष्ट्र

Agneepath: या योजनेमागे भाजप, RSSचा गुप्त अजेंडा - प्रकाश आंबेडकर

दत्ता लवांडे

मुंबई : सध्या देशभरात अग्निपथ लष्कर भरतीवरून गदारोळ पाहायला मिळत आहे. देशभरातील अनेक ठिकाणी हिंसाचार उसळला असून बिहारमध्ये आंदोलकांकडून रेल्वेची जाळपोळ करण्यात आली आहे. यामुळे बिहारमधील १२ शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या योजनेच्या अनेक स्तरातून विरोध होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी यामागे आरएसएसचा (RSS) मोठा अजेंडा असल्याचा आरोप केला आहे.

(Agneepath Scheme Row Update)

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी फेसबुक पोस्ट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "अग्नीवीर या योजनेमागे भाजपा आणि आरएसएसचा गुप्त अजेंडा आहे." असा आरोप करत त्यांनी "सरकारी तिजोरीवर पडणारा ताण कमी करणे, बेरोजगार तरुण सैनिक निर्माण करणे, जेणेकरून त्याचा फायदा हा नाझीसारख्या सेना निर्माण करण्यास मदत होईल व वैदिक हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी या नाझी सेनेचा उपयोग करता येईल." असा आरोप केंद्रावर केला आहे.

दरम्यान केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध म्हणून देशभर सुरू असेलेल्या हिंसाचारामुळे रेल्वे मंत्रालयाने तब्बल ३७९ रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेत चार वर्षांसाठी सैनिकांची भरती करण्याचा आणि त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ७५ टक्के निवृत्ती वेतन आणि इतर सामाजिक सुरक्षा लाभांशिवाय निवृत्त करण्याचा प्रस्ताव आहे. या योजनेला देशातील विविध भागांतून तरुणांकडून तीव्र विरोध होत आहे. या योजनेला विरोध करणाऱ्या आंदोलकांनी रस्ते आणि रेल्वे मार्ग रोखले आणि रेल्वेचे डबे पेटवून दिले आहेत.

दरम्यान बिगर भाजप पक्षांकडून या निर्णयाचा विरोध होताना पाहायला मिळत असून अनेकांनी या निर्णयामुळे संरक्षण क्षेत्राचं खासगीकरण करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. तर प्रकाश आंबेडकर यांनी यामागे भाजपचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गुप्त अजेंडा असल्याचा आरोप केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT