Prakash Ambedkar on Karnataka High Court Hijab Row Judgement  sakal
महाराष्ट्र बातम्या

"कोणत्या समाजात कधी सुधारणा...", हिजाब निकालावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : औरंगाबादेत वंचित बहुजन आघाडीकडून कर्नाटकातील हिजाब गर्ल मुस्कान खानचा (Karnataka Hijab Girl) सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. पण, पोलिसांनी परवानगी नाकारली. आता कर्नाटक हायकोर्टानं हिजाब वादावर (Karnataka High Court Judgement Hijab Row) निकाल दिला असून शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच आहे, असं मत न्यायालयानं मांडलं आहे. त्यावरून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

''मुंबई उच्च न्यायालयाने हिजाब संदर्भात यापूर्वी निकाल दिला होता. कोणी काय पेहराव करावा हा त्यांचा प्रश्न आहे, असं न्यायालयानं म्हटलं होतं'' असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. तसेच कोणत्या समाजात कधी सुधारणा करायच्या हा त्या समाजाचा विषय आहे. तो तुम्हाला लादता येणार नाही, असंही ते म्हणाले.

''विद्यापीठ आणि राज्य सरकार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. विद्यापीठ हे राज्यपालांच्या अधिकारात येतात. पण, हिजाबबाबत कर्नाटक सरकारने निर्णय घेतला आहे. त्यांनी राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना सारखा गणवेश असावा, असा जीआर काढला असता तर गोष्ट वेगळी होती. पण, त्यांच्याकडे असा जीआर दिसला नाही. न्यायालयाने हा जीआर आणि काही तांत्रिक बाबी लक्षात घेतल्या का? हे पूर्ण निकाल वाचल्यानंतरच कळेल'', असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते 'एबीपी माझा'सोबत बोलत होते.

हिजाब गर्लचा सत्कार करण्याचं का ठरवलं? -

कर्नाटकमध्ये हिजाब वादादरम्यान काही भगवे शेले घेतलेल्या विद्यार्थ्यांनी हिजाब घातलेल्या विद्यार्थिनीला घेराव घातला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी ''जय श्री राम''च्या घोषणा दिल्या, तर त्या विद्यार्थिनीनं ''अल्लाह हू अकबर'' असं उत्तर दिलं. त्यानंतर देशभरातून टीका करण्यात आली होती. याच हिजाब गर्ल मुस्कान खानचा सत्कार करण्याचं वंचित बहुजन आघाडीने ठरवलं होतं. पण, पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे वंचितने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये धाव घेतली आहे. मला जो पेहराव करायचा तो मी करेन, असं मुस्कानने ठणकावून सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही तिचा सत्कार करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Tariff: तर हा आहे अमेरिकेचा मास्टर प्लॅन, भारतावर का लावला टॅरिफ? पत्रकार परिषदेत सांगतिलं कारण

Pune Rain Update : पावसाचा जोर पुण्यात ओसरला; कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ

Khadakwasla Dam : पावसाचा जोर ओसरला, खडकवासला धरणातून विसर्गात घट

Solapur Fraud: गृहनिर्माणची जागा परस्पर विकून २७ लाखांचा अपहार; २२ जणांवर गुन्हा, शासनाची फसवणूक

Solapur Accident: 'नान्नजच्या अपघातग्रस्त शेतकऱ्याचा अखेर मृत्यू'; दुचाकीच्या समोर कुत्रा आडवा आल्याने अपघात

SCROLL FOR NEXT