महाराष्ट्र

Loksabha 2019: 'अशोक चव्हाणांसह काॅग्रेसचे 30 टक्के उमेदवार सनातनवाद्यांशी संबंधीत'

भारत नागणे

पंढरपूर: देशात आणि राज्यात आरएसएस आणि सनातन विचाराचे सरकार यावं अशी काॅंग्रेस नेत्यांचीच धारणा आहे. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसह राज्यातील 30 टक्के उमेदवार हे सनातनवाद्यांशी संबंधीत आहेत, असा गंभीर आरोप वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पंढरपुरात केला.

अॅड. प्रकाश आंडेकर यांच्या प्रचारार्थ आज येथील संत तनपुरे महाराज मठात जाहीर सभा झाली. सभेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी काॅंग्रेस आणि भाजपवर त्यांनी सडकून टीका केली.

 अॅड. आंबेडकर म्हणाले, मी सोलापुरातून निवडणूक लढवणार म्हटल्यावर काॅंग्रेस आणि भाजपा उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काॅंग्रेसने आरएसएसला  कायद्याच्या चौकटीत आणावे अशी वारंवार मागणी करुनही काॅंग्रेस याबद्दल काहीच बोलत नाही. यावरुनच काॅंग्रेसचे आरएसएसबद्लचे प्रेम दिसून येते.

काॅंग्रेस आणि तुमचाही आरएसएसला विरोध आहे, तर मग निवडणुका एकत्रिक का लढवत नाही असे विचारले असता, काॅंग्रेला तसे वाटत नाही. लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसह राज्यातील सुमारे 30 टक्के उमेदवार हे सनातनवाद्यांशी संबंधीत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी पवारांचे दाऊदशी संबंध असल्याचे म्हटल्यावर पवारांना ते चांगलेच झोंबले. 1993 नंतर झालेल्या सर्व बाॅम्ब स्फोटामध्ये पाकिस्नाबरोबरच देशातील आणि राज्यातील काही बडया राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचेही त्यांनी सांगितले.

बाॅम्बस्फोट प्रकऱणात अटक करण्यात आलेल्या अनेक आरोपींचे पुढे काय झाले याची कोणालाही माहिती नाही. विचारांच्या लढ्यात देशाचे संविधान वाचले पाहिजे हीच आपली भूमिका असल्याचेही यावेळी आंबेडकर यांनी म्हटले.

सोलापूर जिल्ह्यात सहकाराचे माेठं जाळ आहे. परंतु येथील साखर कारखानदारांनी सहकारचळवळ मोडीत काढली आहे. सहकारी साखर कारखानदादी तोटयात आहे मग त्यांचे खासगी साखर कारखाने नफ्यात कसे असा सवाल ही आंबेडकरांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी माढ्याचे उमेदवार विजय मोरे, शंकर लिंगे, सुरेश कांबळे,मल्हारी कांबळे, माऊली हळणवर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होेते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT