Prasad-Tanpure 
महाराष्ट्र बातम्या

सरकार गेंड्याच्या कातडीचे - तनपुरे

सकाळवृत्तसेवा

राहुरी - ‘‘जायकवाडी’ला पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यावर भाजपचे आमदार मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा फार्स करतात, ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. समन्यायी पाणीवाटप कायदा झाला असला, तरी दुष्काळात होरपळणाऱ्यांच्या तोंडचे पाणी देणे चुकीचे आहे. सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे,’’ अशा शब्दांत माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी आज राज्य सरकारवर टीका केली.

‘जायकवाडी’ला पाणी सोडण्याच्या निर्णयाविरुद्ध विविध पक्ष- संघटनांच्या कार्यकर्त्यांनी नगर- मनमाड मार्गावर बाजार समितीसमोर ‘चक्का जाम’ आंदोलन केले, त्या वेळी तनपुरे बोलत होते. बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (उत्तर) रावसाहेब खेवरे, नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रावसाहेब तनपुरे, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र लांबे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र गुंड, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी डौले आदी उपस्थित होते. तहसीलदार अनिल दोंडे यांना निवेदन देण्यात आले.

तनपुरे म्हणाले, ‘‘जायकवाडीत सध्या पुरेसा साठा आहे. बिअरच्या कारखान्यांना पाणी देणे सयुक्तिक नाही. अडीच टीएमसी वहनतूट ऊर्ध्व धरणांच्या माथी मारली. शासनाला दुष्काळाच्या वास्तवाचे भान नाही. पाणी दिल्यास नगर जिल्ह्यात आठ महिने पाणीटंचाई सहन करावी लागेल. जिल्ह्यात आजच शंभरावर टॅंकर सुरू असून, लवकरच ही संख्या हजारावर जाईल. आमदार शिवाजी कर्डिले यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रक चोरीला गेला... पोलिसांनाही सापडेना, पण कर्जाचे हप्ते सुरू... अखेर तरुणाने संपवले जीवन, आईची मागितली माफी

CSK vs PBKS: ऋतुराज गायकवाडने चेन्नईच्या सलग दुसऱ्या पराभवासाठी कोणाला धरलं जबाबदार? म्हणाला, 'कधी कधी आमच्याकडून...'

Nashik Dindori accident : नाशिक येथील दिंडोरी अपघातातील एकाच कुटुंबातील ९ मृतांची नावे समोर, क्रेनने काढले मृतदेह बाहेर

Farmer Death News : काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेतात काम करताना अंगावर वीज पडली; 50 वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather Alert Today : पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे! महाराष्ट्रातील 'या' 11 जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा, हवामान विभागाचा Yellow Alert जारी

SCROLL FOR NEXT