CSK vs PBKS: ऋतुराज गायकवाडने चेन्नईच्या सलग दुसऱ्या पराभवासाठी कोणाला धरलं जबाबदार? म्हणाला, 'कधी कधी आमच्याकडून...'

CSK Captain Ruturaj Gaikwad on Loss to PBKS IPL 2026: आयपीएल २०२६ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सला पंजाब किंग्सने पराभूत केले. हा चेन्नईचा सलग दुसरा पराभव होता. या पराभवानंतर चेन्नईचा कर्णधार ऋतुराज काय म्हणाला, जाणून घ्या.
Chennai Super Kings

Chennai Super Kings

Sakal

Updated on

चेन्नई सुपर किंग्स संघाला इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेत शुक्रवारी (३ एप्रिल) सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. शुक्रवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने ५ विकेट्सने विजय मिळवला.

चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) हा घरच्या मैदानावर यंदाच्या हंगामातील पहिला सामना होता. मात्र या सामन्यातही चेन्नईला पराभूत व्हावं लागलं आहे. त्यामुळे अद्यापही त्यांच्या खात्यात शून्य गुण आहेत.

या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सकडून आयुष म्हात्रेने ४३ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांसह ७३ धावांची मोठी खेळी केली. तसेच शिवम दुबेने २७ चेंडूत नाबाद ४५ धावा केल्या.

सर्फराज खाननेही १२ चेंडूत ३२ धावा केल्या, तर कर्णधार ऋतुराज गायकवाडने २२ चेंडूत २८ धावांची खेळी केली. त्यामुळे चेन्नईने २० षटकात ५ बाद २०९ धावा उभारल्या होत्या. पंजाबकडून विजयकुमार वैशाखने २ विकेट्स घेतल्या.

<div class="paragraphs"><p>Chennai Super Kings</p></div>
IPL 2026: मुंबई इंडियन्सचा दिल्लीतही दरारा? दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध आज राजधानीत सामना; कशी असेल संभावित Playing XI
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com